उन्हाळ्यात दिवसभर सॉक्स घालून राहणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या गंभीर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 04:42 PM2023-03-28T16:42:35+5:302023-03-28T16:43:22+5:30
Health Tips : अनेकजण झोपतानाही मोजे वापरतात. हेही चुकीचे आहे. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात सतत सॉक्स वापरल्याचे काय दुष्पपरिणाम होतात.
Health Tips : सॉक्स म्हणजे मोजे घालणं आता रोजच्या जीवनातील महत्वाचा भाग झाले आहेत. शूज वापरण्याचं प्रमाण वाढल्याने सॉक्सही आलेच. पण सतत सॉक्स घालणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. खासकरून उन्हाळ्यात सतत सॉक्स घालणं चांगलंच महागात पडू शकतं. अनेकजण झोपतानाही मोजे वापरतात. हेही चुकीचे आहे. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात सतत सॉक्स वापरल्याचे काय दुष्पपरिणाम होतात.
रक्त संचार प्रभावित होणे
शरीराच्या प्रत्येक अंगाला रक्ताची गरज असते. घट्ट मोजे घातल्याने पायांच्या नसा दबल्या जातात. त्या दबलेल्या नसांमध्ये योग्यप्रकारे रक्त संचार होत नाही. याकारणाने पूर्ण शरीरातील रक्त संचार प्रभावित होतो. यामुळे पायांचा त्रास वाढतो. पाय दुखायला लागतात.
एडीमा होऊ शकतो
शरीरातील एखाद्या भागात तरल पदार्थ जमा होणे आणि त्या जागेवर सूज येणे हे एडीमाचे लक्षण आहे. ही सूज हळूहळू वाढू लागते. यामुळे पाय सुन्न होतात. ही बाब फार गंभीर आहे. वेळीच डॉक्टरांची सल्ला न घेतल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो.
फंगल इन्फेक्शनचा धोका
पायातून येणारा घाम मोज्यांमध्ये मुरतो. पण जास्तवेळ मोजे तसेच घालून ठेवल्याने मोज्यामधील घाम पूर्णपणे कोरडा होत नाही. त्या मोज्यांमध्ये ओलावा असल्याने त्यात बॅक्टेरिया आणि विषाणू होतात. याच कारणाने फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
अशी घ्या काळजी
डॉक्टर लहान मुलांना नेहमीच जरा मोठे मोजे घेण्याचा सल्ला देतात. सिंथेटीकचे मोजे वापरण्यापेक्षा सूती कापडाचे मोजे वापरावे.