ेसारांश

By Admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:51+5:302015-09-04T22:45:51+5:30

पुणे:

The Summary | ेसारांश

ेसारांश

googlenewsNext
णे:

मंगळागौर स्पर्धा
यशस्विनी महिला प्रतिष्ठान, राष्ट्रवादी कॉँग्रेस व महापालिका यांच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिनव मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी ही माहिती दिली. यात स्पर्धक संघांनी आपल्या कार्यक्रमातून सामाजिक संदेश प्रसारीत होईल अशा प्रकारे आपला कार्यक्रम सादर करायचा आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह पद्मावती येथे ७ सप्टेंबरला सकाळी १० ते रात्री ८ यावेळात स्पर्धा होईल. विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या कारवाईचा निषेध
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कात्रज परिसरात संतोषनगर येथे पथारी व्यावसायिकांवर सातत्याने होत असलेल्या कारवाईचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. पक्षाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी ही कारवाई आकसाने केली जात असल्याचे म्हटले आहे. या सर्व पथारी व्यावसायिकांना महापालिकेने प्रमाणपत्र दिले आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जाते. महापालिकेने त्यांचे पुर्नवसन करावे किंवा त्यांना शांतपणे व्यवसाय करू द्यावा अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.


Web Title: The Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.