उन्हाळा आला, काळजी घ्या! थंड थंड वाटणारा हा आईस गोळा नव्हे तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 10:15 AM2022-03-15T10:15:42+5:302022-03-15T10:16:10+5:30
मोठ्या आकाराचा बर्फ करण्यासाठी व तो फार काळ टिकावा यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात अमोनियम वायूचा वापर केला जातो
सातारा : उन्हात फिरून तहान लागल्यास ती भागवण्यासाठी सध्या सरबत, लस्सी, गोळा आदी शीतपेय घेतली जातात. खाण्याचा बर्फ किंवा कच्चा माल आणि तयार अन्नपदार्थांच्या दर्जाची खात्री करणे आवश्यक आहे. औद्योगिक वापराचा बर्फ खाण्यात आल्यास त्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. थंड थंड वाटणारा आईस गोळा हा विषाचा गोळाही ठरू शकतो. त्यामुळे ते खाताना वापरण्यात आलेल्या पदार्थाची खात्री करणे आरोग्यासाठी हितकारक आहे.
२) फूड ॲण्ड ड्रग्जची परवानगी आहे का?
अखाद्य बर्फाच्या उत्पादकांनी त्यात १० पीपीएम रंगाचा वापर केला नाही तर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नियम व नियमन २०११ मधील तरतुदीनुसार कमीत कमी सहा महिने शिक्षा होऊ शकते.
३) अखाद्य बर्फातील वायू घातकच
बर्फ बनविण्यापासून त्याच्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. मोठ्या आकाराचा बर्फ करण्यासाठी व तो फार काळ टिकावा यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात अमोनियम वायूचा वापर केला जातो. त्याच्या जोडीला अन्य वायूंचाही उपयोग होतो. हे वायू मानवी आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतात.
४) गंज चढलेल्या साच्यात बनतो बर्फ
दृष्टिआड सृष्टी अशी एक लोकप्रिय म्हण आहे. या म्हणीनुसार कारखान्यात तयार होणाऱ्या बर्फाचे साचे अनेकदा गंजलेल्या अवस्थेत असतात. बर्फाच्या लाद्या तयार करण्यासाठी तीन थर दिलेल्या पत्र्याचे साचे वापरावेत असा नियम आहे. त्यांची किंमत जास्त असल्यामुळे एक थर दिलेल्या पत्र्याचे साचे वापरले जातात. त्यामुळे ते लवकर गंजतात. ग्राहकांना तयार शुभ्र बर्फ दिसत असल्याने गंज चढलेल्या त्याच्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही.
५) अस्वच्छ पाण्यातून बर्फाची निर्मिती
बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना नळाचे पाणी पुरत नाही. म्हणून काही जण खासगी टँकरचे पाणी आणून त्यातून बर्फ तयार करतात. काही कारखाने विहीर किंवा बोअरचे पाणी बर्फ तयार करण्यासाठी वापरतात. हे पाणी पिण्यास योग्य आहे का नाही याची कोणतीही खातरजमा या कंपन्यांकडून होत नाही. बहुसंख्य बर्फ अस्वच्छ पाण्यापासून तयार होतो.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात बर्फ, लस्सी, रसवंतीगृह येथील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई निश्चित करण्यात येणार आहे. सातारकरांना भेसळ करणारे कोणी आढळले तर त्यांनी अन्न प्रशासनाला याची माहिती द्यावी. - अपर्णा भोईटे, सहायक आयुक्त, अन्न विभाग, सातारा