Summer Health Tips : उसाचा रस पिण्याचे फायदे माहीत असतील आता गंभीर नुकसानही जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:45 PM2022-03-15T12:45:18+5:302022-03-15T12:45:48+5:30

Side Effects of sugarcane juice : उसाच्या रसामध्ये खूपसारे पोषक तत्व असतात ज्यात कार्बोहायड्रेट, प्रोटून, पोटॅशिअम, मिनरल्स, आय़र्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस इत्यादींचा समावेश आहे.

Summer Health Tips : Side effects of sugarcane Juice | Summer Health Tips : उसाचा रस पिण्याचे फायदे माहीत असतील आता गंभीर नुकसानही जाणून घ्या!

Summer Health Tips : उसाचा रस पिण्याचे फायदे माहीत असतील आता गंभीर नुकसानही जाणून घ्या!

googlenewsNext

Side Effects of sugarcane juice : उन्हाळा सुरू झाला की, लोक सर्वात जास्त उसाचा रस पितात. लहान शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत सगळीकडे हा रस लोकांचा फेवरेट आहे. उसाचा रस टेस्टी असण्यासोबतच शरीराला आतून थंड करतो. सोबतच यातून शरीराला बरेच फायदे होतात.

उसाच्या रसामध्ये खूपसारे पोषक तत्व असतात ज्यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, पोटॅशिअम, मिनरल्स, आय़र्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस इत्यादींचा समावेश आहे. हे सगळे पोषक तत्व शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतात. मात्र, हेही तितकंच खरं आहे की उसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीराला नुकसानही होतं. एका दिवसात कुणीही दोन ग्लासपेक्षा जास्त उसाचा रस पिऊ नये. चला जाणून घेऊन उसाचा रस जास्त पिण्याचे नुकसान...

उसाच्या रसात जास्त असतात कॅलरी

उसाच्या रसामध्ये कॅलरींचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्ही वजन कमी करत असाल, उसाचा रस कमी प्या. एका ग्लास उसाच्या रसात जवळपास २५० कॅलरी आणि १०० ग्रॅम शुगर असते. अशात उसाचा रस न प्यायल्यास बरं होईल. जेणेकरून वजन कंट्रोलमध्ये राहिल. यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी आणि ग्लायसेमिक लोड जास्त असतो. याने शुगर लेव्हल प्रभावित होते. अशात डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी यापासून दूर रहावं.

पोट होऊ शकतं खराब

जर तुम्ही एका दिवसात ५ ते ५ ग्लास उसाचा रस सेवन करत असाल तर तुमची हालत खराब होऊ शकते. यात पोलिकोसनॉल नावाचं तत्व असतं. जे शरीराला नुकसान पोहोचवतं. याने पोट खराब होण्यासोबतच उलटी, चक्कर येणे, इंसोम्नियाचा धोका निर्माण होऊ शकतो.

संक्रमण होण्याचा धोका वाढतो

उसाचा रस स्वच्छ ठिकाणीच प्यावा. कारण अस्वच्छता असेल तर माश्या लागतात आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जात नाही. काही ठिकाणी उस व्यवस्थित स्वच्छ न करताही मशीनमध्ये टाकला जातो. याने त्यावर लागलेली  धुळ, माती रसात मिश्रित होते. याने संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. 

जास्त वेळ ठेवलेला रस पिऊ नये

अनेक लोक मार्केटमधून उसाचा रस आणतात आणि फ्रिजमध्ये ठेवतात. त्यानंतर २ ते ३ तासांनी हा रस पितात. हे करणं महागात पडू शकतं. उसाचा रस फार लवकर खराब होतो, सोबतचो दूषितही होतो. उसाचा रस तुम्ही १५ ते २० मिनिटांपेक्षा जास्त ठेवू शकत नाही. जास्त वेळ ठेवला तर तो ऑक्सीडाइज होतो. जास्त वेळ ठेवलेला रस प्यायले तर अनेक शारीरिक समस्या होऊ शकतात. नेहमीच फ्रेश ज्यूसचं सेवन करा.

रक्त पातळ होतं उसाच्या रसाने

जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्त पातळ होऊ शकतं. कारण यात पोलिकोसनॉल असल्याने रक्त पातळ होऊ शकतं. अशात काही कापलं किंवा लागलं तर रक्त येणं बंद होण्यास वेळ लागतो आणि तेवढ्यात खूप रक्त वाहून जातं. जे लोक रक्त पातळ करण्यासाठी औषध घेत आहेत त्यांनी उसाचा रस पिऊ नये.
 

Web Title: Summer Health Tips : Side effects of sugarcane Juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.