उन्हाळ्यामध्ये हायजीन राहण्यासाठी या टिप्स वापरा; अनेक आजारांपासून होईल सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 03:09 PM2019-04-12T15:09:23+5:302019-04-12T15:14:15+5:30

हायजीनबाबत सर्वचजण बोलत असतात. पण अनेकदा लोक यासाठी अनेक नियमांचे पालन करतात. हायजीन म्हणजेच, स्वच्छता राखणं. याचा आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होत असतो.

Summer hygiene tips in marathi for good health | उन्हाळ्यामध्ये हायजीन राहण्यासाठी या टिप्स वापरा; अनेक आजारांपासून होईल सुटका

उन्हाळ्यामध्ये हायजीन राहण्यासाठी या टिप्स वापरा; अनेक आजारांपासून होईल सुटका

googlenewsNext

(Image Credit : State Farm)

हायजीनबाबत सर्वचजण बोलत असतात. पण अनेकदा लोक यासाठी अनेक नियमांचे पालन करतात. हायजीन म्हणजेच, स्वच्छता राखणं. याचा आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होत असतो. मग ते पर्सनल हायजीनबाबत असो किंवा घरातील साफ-सफाईबाबत असो. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणं म्हणजे, आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देणं होय. जी लोक हायजीनबाबत सतर्क असतात. त्या अधिक निरोगी असतात. अशा व्यक्तीना लगेच कोणतंही इन्फेक्शन होत नाही आणि अ‍ॅलर्जीही होत नाही. 

आरोग्य बिघडणं आणि काळजी घेणं आपल्याच हातात असतं. वातावरणं कसंही असो, हानिकारक किटाणू आणि बॅक्टेरिया कोणत्याही वातावरणात येत असतात. ज्यामुळे खोकला, सर्दी, ताप, पोट आणि त्वचेच्या समस्या, कंन्जांक्टिवायटिस यासारख्या समस्या होण्याचा धोका वाढतो. अशातच हायजीन मेंटेन केल्याने स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकता. असं केल्याने तुम्ही 40 टक्के किटाणु संबंधित आजार थांबवू शकता. उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारासोबतच, घरातील स्वच्छतेचीही काळजी घेणं गरजेचं असतं. पर्सनल हायजीनमध्ये तोंड, केस, नखं तसेच एखदी जखम झाली असल्यास तिची काळजी घेणं, हातांची स्वच्छता राखणं, आंघोळ करणं इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. 
या गोष्टींची काळजी घ्या :

(Image Credit : Active.com)

- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम अधिक येतो. अशातच आंघोळीसाठी किटाणुनाशक साबणाचा वापर करा. यामुळे इन्फेक्शन होत नाही. घरातून बाहेर जात असाल तर त्यासोबत हॅन्ड सॅनिटायझर ठेवा. काहीही खाण्याआधी हात स्वच्छ करायला विसरू नका. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासायला विसरू नका. 

- पर्सनल हायजीनप्रमाणेच फूड हायजीनही अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी खाद्य पदार्थ उघड्यावर न ठेवता झाकून ठेवा. यामुळे अनेक आजारांपासून बचाव करणं सहज शक्य होतं. फळं, हिरव्या पालेभाज्या व्यवस्थित धुवून त्यानंतरच शिजवा. उन्हाळ्यामध्ये फूड पॉयझनिंगचा धोका अधिक असतो, त्यामुळे काळजी घेणं आवश्यक असतं. 

(Image Credit : pediatrichealthcarenw.com)

- मुलांनाही हायजीनचं महत्त्व पटवून सांगा. तोडांची स्वच्छता राखण, दात घासणं, हात व्यवस्थित धुणं, केसांची काळजी घेणं इत्यादी गोष्टींचा रूटिनमध्ये समावेश करा. आरोग्य जप्यासाठी स्वच्छता गरजेची असते, हे त्यांना समजावून सांगा. 

- अनेक महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात. येथे जाण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये कितपत स्वच्छता राखण्यात येते आहे, याकडे लक्ष द्या. अस्वच्छस जुने प्रोडक्ट्स वापरणाऱ्या पार्लरमध्ये जाणं शक्यतो टाळा. अन्यथा स्किन इन्फेक्शन किंवा इतर समस्या होण्याचा धोका असतो. पार्लर प्रोडक्ट्सची स्वच्छता राखा. 

- तुम्ही वापरत असलेले प्रोडक्ट्स इतरांसोबत शेअर करू नका. जर समोरच्या व्यक्तीला त्वचेसंबंधित कोणतंही इन्फेक्शन झालं असेल तर त्यामुळे ते तुम्हालाही होऊ शकतं. प्रोडक्ट्सची एक्सपायरी डेट चेक करा. तारिख संपलेले प्रोडक्ट्स वापरल्याने त्वचेला नुकसान पोहचू शकतं. 

या गोष्टीही लक्षात ठेवा :

घरातील बाथरूमच्या स्वच्छतेवरही लक्ष द्या. पर्सनल हायजीनमध्ये बाथरूमचाही समावेश होतो. अशातच बाथरूमच्या स्वच्छतेवर लक्ष द्या. त्यामुळे इन्फेक्शनपासून दूर राहू शकता. तसेच काही दिवसांनी बादली, मग, टब, नळ, शॉवर इत्यादी गोष्टी व्यवस्थित स्वच्छ करा. तसचे टॉयलेट सीटला दर आठवड्याला टॉयलेट क्लीनरच्या मदतीने स्वच्छ करा. 

टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Summer hygiene tips in marathi for good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.