Drinking Water Benefits: त्वचा ड्राय होऊ नये म्हणून दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 02:23 PM2022-04-19T14:23:21+5:302022-04-19T14:26:00+5:30

Water for Healthy Skin : पाण्याने केवळ आरोग्यालाच नाही तर त्वचेलाही महत्वाचे फायदे होतात. अशात आरोग्य चांगलं ठेवण्यासोबत त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे हे माहीत असणं महत्वाचं आहे.

Summer Tips : How much water should you drink per day for healthy and glowing skin | Drinking Water Benefits: त्वचा ड्राय होऊ नये म्हणून दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

Drinking Water Benefits: त्वचा ड्राय होऊ नये म्हणून दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

googlenewsNext

How Much Water Should You Drink Per Day: कलर आणि टेस्ट नसूनही पाणी हे जीवन आहे. पाण्याचं आपल्या जीवनातील महत्व सर्वांनाच माहीत आहे. पाणी नसेल तर जगणं कठिण होतं. पाण्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. म्हणजे जर शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळालं नाही तर वेगवेगळ्या गंभीर समस्या होऊ शकतात. पाण्याने शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक आजार दूर होतात. पाण्याने केवळ आरोग्यालाच नाही तर त्वचेलाही महत्वाचे फायदे होतात. अशात आरोग्य चांगलं ठेवण्यासोबत त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे हे माहीत असणं महत्वाचं आहे.

पाणी पिण्याचे त्वचेला होणारे फायदे

- जेव्हा वेगाने वजन कमी होतं तेव्हा त्वचा सैल पडू लागते. ज्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक पाणी कमी पितात. पण ही पद्धत चुकीची आहे. उलट योग्य प्रमाणात पाणी प्यावं. याने त्वचा हळूहळू पुन्हा टाइट होऊ लागते आणि त्यावर हेल्दी ग्लो सुद्धा येऊ लागतो.

- त्वचेची पीएच लेव्हल योग्य असणं फार महत्वाचं असतं. हाय पीएचमुळे त्वचा ड्राय होऊ लागते. त्वचेची पीएच लेव्हल कायम ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

- शरीरात विषारी पदार्थ असतील तर पिंपल्स, अॅलर्जी, तेलकटपणा अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अशात हे विषाक्त पदार्थ शरीरातून बाहेर काढण्याचं काम पाणी करतं. त्यामुळे पाणी पिण्याचा आळस करू नये किंवा कमी पाणी पिऊ नये.

- योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट राहतात. ज्यामुळे सुरकुत्या, भेगा पडत नाही आणि त्वचा टाइट होते. त्यामुळे पाणी यासाठीही महत्वाचं आहे.

- वाढत्या वयासोबत त्वचा ओलावा ठेवण्यात जरा कमजोर पडते. पण योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर त्वचेत ओलावा कायम राहतो. याने त्वचेवर रॅशेसही येणार नाहीत.

एका दिवसात किती ग्लास पाणी?

हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, मेटाबलिज्म, वजन, उंची आणि त्वचेसाठी रोज ६ ते ८ ग्लास पाणी प्यावे. उन्हाळ्यात हे प्रमाण थोडं वाढवूही शकता. याने त्वचे टाइट होते, त्यावर चमक येईल आणि आरोग्य सुद्धा चांगलं राहतं.
 

Web Title: Summer Tips : How much water should you drink per day for healthy and glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.