Heart Attack पासून वाचवतात सूर्यफुलाच्या बीया, Cholesterol ठेवतात कंट्रोलमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 02:48 PM2023-06-08T14:48:02+5:302023-06-08T14:50:09+5:30
Sunflower Seeds Benefits: सूर्यफुलाच्या बियांमध्ये अनेक औषधी गुण असतात. अनेक रिसर्चमधून या औषधी गुणांबाबत समजलं आहे. ज्यांनी शरीराला अनेक लाभ मिळतात. चला तेच जाणून घेऊया...
Sunflower Seeds Benefits: सूर्यफूल हे जगातल्या अनेक सुंदर फुलांपैकी एक आहे. मात्र हे फूल फक्त दिसायलाच सुंदर नाही तर आरोग्यासाठीही अनेक दृष्टीने महत्वाचं असतं. सूर्यफुलाच्या बियांमध्ये अनेक औषधी गुण असतात. अनेक रिसर्चमधून या औषधी गुणांबाबत समजलं आहे. ज्यांनी शरीराला अनेक लाभ मिळतात. चला तेच जाणून घेऊया...
सूर्यफुलाच्या बियांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, अॅंटी-इंफ्लामेटरी गुण असतात. तसेच या बियांमध्ये फ्लेवोनॉइड, पॉलीसॅच्युरेटेड फॅटी अॅंसिड आणि व्हिटॅमिन असतात. जे हृदयासंबंधी आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.
सूर्यफुलाच्या बियांच्या माध्यमातून शरीरातील बॅड कॉलेस्ट्रोलची लेव्हल कंट्रोल केली जाऊ शकते. या बियांमध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असतं जे ब्लड वेसेल्ससाठी फायदेशीर असतं. याने हाड ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि कॉलेस्ट्रोल वाढण्याचा धोका कमी होतो.
सूर्यफुलाच्या बियांचं सेवन महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासही मदत करतात.सूर्यफुलाच्या बियांमध्ये लिगनेन असतं, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. लिगनेन एकप्रकारचं पॉलीफेनोल असतं जे शरीरात अॅंंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं.
मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी सूर्यफुलाच्या बीया कामात येऊ शकतात. या बियांमध्ये कॅल्शिअम व झिंकसारखे पोषक तत्व असतात. जे मेंदुच्या विकासात फायदेशीर असतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये आयरन, झिंक, कॅल्शिअम असतं. जे हाडांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर असतं.