ब्रेस्ट कॅन्सर टाळायचा असेल तर दररोज 'ही' गोष्ट करा, संशोधनातून सांगितला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 02:53 PM2022-01-16T14:53:39+5:302022-01-16T15:00:38+5:30

अलीकडच्या काळात त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सूर्यप्रकाश टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, सनबर्न शरीराच्या संरक्षणासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

sunlight vitamin d deficiency can cause breast cancer says study | ब्रेस्ट कॅन्सर टाळायचा असेल तर दररोज 'ही' गोष्ट करा, संशोधनातून सांगितला उपाय

ब्रेस्ट कॅन्सर टाळायचा असेल तर दररोज 'ही' गोष्ट करा, संशोधनातून सांगितला उपाय

googlenewsNext

शरीरात कर्करोगाचा विकास आणि प्रसार आणि त्याच्या उपचारांविषयी जगभरात सतत अभ्यास चालू आहेत. या अभ्यासांमध्ये, रोग समजून घेण्याचे आणि उपचार करण्याचे नवीन मार्ग देखील पुढे येत आहेत. यातच काम करणाऱ्या अमेरिकेतील बफेलो विद्यापीठ (University of Buffalo) आणि पोर्तो रिको विद्यापीठातील (University of Puerto Rico) शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन अभ्यासात असं आढळून आलंय की, सूर्यप्रकाशामुळं स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) होण्याचा धोका कमी होतो.

सूर्यप्रकाशात आणि सूर्य नसलेल्या स्थितीत त्वचेच्या रंगद्रव्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या घटकांच्या तुलनात्मक अभ्यासासाठी संशोधकांनी क्रोमोमीटरचा वापर केला. त्वचेशी सूर्यप्रकाशाच्या कमी-अधिक प्रमाणात आलेल्या संपर्कामुळं झालेल्या त्वचेच्या पिग्मेंटेशनमधील फरकावर आधारित हा अभ्यास आहे. पोर्तो रिकोमध्ये केलेला हा अभ्यास कॅन्सर एपिडेमियोलॉजी, बायोमार्कर्स अँड प्रिव्हेंशन (Cancer Epidemiology, Biomarkers and Prevention) या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

बफेलो विद्यापीठातील एपिडेमियोलॉजी आणि पर्यावरणीय आरोग्य विभागातील प्राध्यापक आणि अभ्यासाचे वरिष्ठ लेखक जो. एल. फ्रायडेनहेम (Jo L. Freudenheim) म्हणाले की, इथं संपूर्ण वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश असतो. तरीही लोकांच्या त्वचारंगात अनेक भिन्नता असतात. यामध्ये असे काही पुरावे आढळून आलेत की, सूर्यप्रकाशात अधिक प्रमाणात आल्यामुळं स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. मात्र, यामध्येही अनिश्चितता आढळून आली आहे. परंतु या निष्कर्षाला समर्थन देणारी (Sunlight Reduces the Risk of Breast Cancer) अनेक कारणं आहेत.

प्रोफेसर फ्रायडेनहेम यांनी पुढे स्पष्ट केलं की, यातील एक टप्पा सूर्यप्रकाशात शरीरातील व्हिटॅमिन डीच्या अंतर्गत उत्पादनाशी संबंधित आहे. सूर्यप्रकाश शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये जळजळ, लठ्ठपणा आणि त्याचा सर्कॅडियन सिस्टीम, म्हणजेच शरीराच्या अंतर्गत घड्याळावर होणारा परिणाम यांचा समावेश होतो. अलीकडच्या काळात त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सूर्यप्रकाश टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, सनबर्न शरीराच्या संरक्षणासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

सूर्यप्रकाश आणि स्तनाच्या कर्करोगासंबंधीचे पूर्वीचे अभ्यास अशा ठिकाणी केले गेलेत, जिथं ऋतूनुसार अतिनील किरणांमध्ये बदल होतात किंवा काही वेळेस हे किरण खूप कमी होतात किंवा त्यांचं अस्तित्व फारसं राहत नाही. परंतु पोर्तो रिकोमध्ये, अतिनील किरणांमध्ये ऋतूनुसार कोणतेही महत्त्वपूर्ण चढउतार नाहीत. तिथं घराबाहेर पडणाऱ्या लोकांना अतिनील किरणोत्सर्गाचा सामना कायम करावा लागतो.

पोर्तो रिको विद्यापीठातील एपिडेमियोलॉजी (महामारीसंबंधी विज्ञान) प्राध्यापक आणि संशोधनाचे पहिले लेखक क्रुझ एम. नाझारियो म्हणाले की, अभ्यासात वेगवेगळ्या पातळ्यांवर समान परिणाम आढळले आहेत. त्यांनी सांगितलं की, ज्या महिला जास्त उन्हात राहतात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी असतो. त्याचप्रमाणे, ज्या सहभागींची त्वचा गडद होती त्यांना इस्ट्रोजेन रिसेप्टरचा (Estrogen receptor) धोका कमी होता.

Web Title: sunlight vitamin d deficiency can cause breast cancer says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.