सनी लिओनी या आजाराने होती ग्रस्त; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 06:11 PM2019-01-11T18:11:06+5:302019-01-11T18:18:37+5:30

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लियोनी अ‍ॅपेंडिक्सच्या आजाराने ग्रस्त होती. रिअ‍ॅलिटी शो 'स्पील्ट्सविला 11'च्या शूटिंग दरम्यान सनीला पोटात दुखू लागल्यामुळे तिने तत्काळ तपासण्या करून घेतल्यावर अ‍ॅपेंडिक्स असल्याचे तिला समजले.

Sunny leone had appendix know cause symptoms and treatment | सनी लिओनी या आजाराने होती ग्रस्त; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

सनी लिओनी या आजाराने होती ग्रस्त; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

Next

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लियोनी अ‍ॅपेंडिक्सच्या आजाराने ग्रस्त होती. रिअ‍ॅलिटी शो 'स्पील्ट्सविला 11'च्या शूटिंग दरम्यान सनीला पोटात दुखू लागल्यामुळे तिने तत्काळ तपासण्या करून घेतल्यावर अ‍ॅपेंडिक्स असल्याचे तिला समजले. आता सनी फिट अ‍ॅन्ड फाइन आहे. पण तुम्हाला अ‍ॅपेंडिक्स होण्याची खरी कारणं माहीत आहेत का? जाणून घेऊया अ‍ॅपेंडिक्स होण्यामागील कारणं, लक्षणं आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांबाबत...

10 ते 30 वयाच्या लोकांमध्ये उद्भवते ही समस्या

अपेंडिक्स एक अशी समस्या आहे, जी 10 ते 30 वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. याचा त्रास पोटाच्या डाव्या बाजूला होतो. जर यामध्ये इन्फेक्शन झालं असेल तर हात लावला तरिही वेदनांचा त्रास होतो. अ‍ॅपेंडिक्स आतड्यांचाच एक हिस्सा असतो. ज्याचं काम शरीरातील सेलूलोज पचवणं असतं. 

कसा होतो हा आजार?

अ‍ॅपेंडिक्सची नाडी छोटं आतडं आणि मोठं आतडं एकत्र येणाऱ्या ठिकाणी असते. या नाडीचा एक भाग बंद आणि एक भाग तसाच ओपन असतो. जेव्हा यामध्ये कण जमा होण्यास सुरुवात होत जाते. त्यावेळी दुसरीबाजू बंद असल्यामुळे ते कण बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे अ‍ॅपेंडिक्सला सुरुवात होते. 

या कारणांमुळेही होतो अ‍ॅपेंडिक्सचा त्रास 

अ‍ॅपेंडिक्सचं इन्फेक्शन होण्याची अनेक कारणं असतात. जसं फायबर असणाऱ्या पदार्थांच्या कमतरतेमुळे, फळांच्या बीयांच्या सेवनाने आणि बद्धकोष्ठाच्या त्रासामुळे होतो. 

या आजाराची लक्षणं :

  • विष्ठेतून कफ येणं
  • पोट आणि नाभिमध्ये सतत वेदना जानवणं
  • पोटात सूज येणं
  • भूक न लागणं
  • बद्धकोष्ठाची समस्या
  • अस्वस्थ वाटणं

 

या दुखण्यापासून सुटका करून घेण्यासाठी हे उपचार करतील मदत :

अनेकदा हा आजार घरगुती उपाय किंवा योग्य औषधोपचारांमुळे ठइक होऊ शकतो. परंतु सतत अ‍ॅपेंडिक्सचा त्रास होत असेल तर डॉक्टर अ‍ॅपेंडिक्स काढून टाकतात. जाणून घेऊया सततच्या अ‍ॅपेंडिक्सच्या दुखण्यापासून सुटका करण्याचे काह घरगुती उपाय...

आलं 

अ‍ॅपेंडिक्सचं दुखणं दूर करण्यासाठी दिवसातून कमीतकमी दोन वेळा आल्याच्या चहाचे सेवन करावे. हा चहा तयार करण्यासाठी एक कप पाण्यामध्ये एक चमचा आलं टाकून उकळून घेवून त्यामध्ये मध एकत्र करा.

लसूण

अनोशापोटी 2 ते 3 कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाल्याने वेदना कमी होतात. तुम्ही खाण्यामध्येही लसणाचा प्रयोग करू शकता. 

पुदिना

एक चमचा पुदिनाच्या पानांचा रस एक कप पाण्यामध्ये टाकून 10 मिनिटांसाठी उकळून घ्या. थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध एकत्र करून  दिवसातून दोन वेळा याचं सेवन करा. 

तुळस 

तुळशीचा पानं, एक छोटा चमचा आलं आणि एक कप पाण्यामध्ये उकळून घ्या. या चहाचे सेवन दिवसातून 2 ते 3 वेळा करा. हा दुखण्यापासून सुटका करण्यासाठी तुळशीची 3 ते 4 पानं चावून खा. 

कोरफडीचा ज्यूस 

कोरफडीच्या रसाचे दररोज सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाम स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच अ‍ॅपेंडिक्सचं दुखणंही दूर होतं. 

अ‍ॅपेंडिक्सपासून बचाव करण्यासाठी काही टिप्स :

- अ‍ॅपेंडिक्सच्या दुखण्यापासून दूर राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.

- आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यामुळे अ‍ॅपेंडिक्सचा धोका कमी होतो.

- आहारामध्ये सफरचंद, हिरव्या पालेभाज्या, सलाड यांचा समावेश करा.

- सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवणाची वेळ ठरवून घ्या. 

Web Title: Sunny leone had appendix know cause symptoms and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.