योग्य ती काळजी न घेतल्यास जीवघेणे ठरू शकतात हे 'Superbugs'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 10:06 AM2019-11-18T10:06:20+5:302019-11-18T10:12:07+5:30

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे दिवसेंदिवस लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. तर यावर उपचारासाठी अलिकडे अ‍ॅंटी-बायोटिक औषधे अधिक प्रमाणात दिली जातात.

Superbug's and effect of antibiotics | योग्य ती काळजी न घेतल्यास जीवघेणे ठरू शकतात हे 'Superbugs'

योग्य ती काळजी न घेतल्यास जीवघेणे ठरू शकतात हे 'Superbugs'

Next

(Image Credit : thesouthafrican.com)

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे दिवसेंदिवस लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. तर यावर उपचारासाठी अलिकडे अ‍ॅंटी-बायोटिक औषधे अधिक प्रमाणात दिली जातात. ही औषधे अनेकप्रकारच्या बॅक्टेरियासोबत लढण्यासाठी आणि त्यांपासून लोकांचा बचाव करण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरल्या आहेत. त्यामुळेच जगभरातील फार्मा कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉंग अ‍ॅंटी-बायोटिक औषधे तयार करण्याची शर्यत लागली आहे. याचं एक कारण म्हणजे बॅक्टेरियाची अ‍ॅंटी-रेसिस्टंट पॉवर वाढणे. 

(Image Credit : business-standard.com)

आतापर्यंत ज्या अ‍ॅंटी-बायोटिकच्या भरोशावर आपण हे मानत होतो की, याचा डोज घेतल्यावर आपण, आपली जनावरे किंवा आपल्या खाण्यातून बॅक्टेरिया नष्ट झाले आहेत. आता तोच डोज या मायक्रोऑर्गेनिजमसाठी पुरेशे राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका रिसर्चमधे अनेक नवीन बॅक्टेरियाचा आढळून आलेत. या बॅक्टेरियांवर अ‍ॅंटी-बायोटिकच्या जुन्या डोजचा अजिबात प्रभाव दिसत नाही. त्यामुळे हे बॅक्टेरिया दरवर्षी अनेक लोकांचा जीव घेत आहेत.

(Image Credit : independent.co.uk)

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रिव्हेन्शन द्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, एकट्या अमेरिकेत दर तासाला या सुपरबग्स म्हणजेच नव्या बॅक्टेरियामुळे चार लोकांचा जीव जात आहे. तसेच या रिपोर्टमधून आरोग्यासंबंधी इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याने भिती वाटणं सहाजिक आहे. 

या रिपोर्टच्या आधारावर तज्ज्ञांकडून असं सांगितलं जात आहे की, यात अजिबात दुमत नाही की, पुढील काळात अ‍ॅंटी-बायोटिक प्रभावी ठरणार नाहीत. याची उदाहरणे आधीही बघायला मिळालीत. विचार करण्यासारखी बाब ही आहे की, या बॅक्टेरिया द्वारे वाढवण्यात आलेल्या अ‍ॅंटी-रेसिस्टन्सीला पकडण्यात यश आलं नाही.

(Image Credit : theconversation.com)

कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी वैज्ञानिक हे सतत नव्या अ‍ॅंटी-बायोटिकवर काम करत असतात. पण त्या नव्या पर्यायांचा विकास हळूवार आणि खूप जास्त महागडा असतो. सीडीसीनुसार, या स्थितीसोबत निपटण्यासाठी आजच्या काळात सर्वात चांगला पर्याय म्हणजे वॅक्सिनेशन आहे. कारण याने आपल्या शरीरात संक्रमण होण्याआधीच आपलं शरीर त्यासोबत लढण्यासाठी तयार राहतं. या गंभीरतेने याकडे लक्ष दिलं गेलं तर आपल्याला अ‍ॅंटी-बायोटिक्सची गरज पडणार नाही.


Web Title: Superbug's and effect of antibiotics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.