Tea Bag मुळे चहाच्या कपात पोहोचत आहेत अब्जावधी Microplastics, वेळीच व्हा सावध...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 10:28 AM2019-09-27T10:28:50+5:302019-09-27T10:52:01+5:30
जर तुम्ही टी बॅगपासून तयार केलेला चहा सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तसेच तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे.
जर तुम्ही टी बॅगपासून तयार केलेला चहा सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तसेच तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण एका रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, प्लॅस्टिक टी बॅग तुमच्या पेय पदार्थात सूक्ष्म किंवा नॅनो आकाराचे लाखो प्लॅस्टिक कण पोहोचवू शकते.
एन्वायर्नमेंटल सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, या सूक्ष्म कणांना शरीरात घेतल्यावर याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही. प्लॅस्टिक दिवसेंदिवस छोट्या छोट्या कणांमध्ये वेगळं होत असतं. प्लॅस्टिकच्या या सूक्ष्म कणांचा आकार १०० नॅनोमीटरपेक्षाही कमी असतो.
हे घातक आहे का?
कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी पर्यावरण, पाणी आणि खाद्यात असलेल्या अति सूक्ष्म कणांची माहिती मिळवली. पण आतापर्यंत हे समजू शकलं नाही की, हे मनुष्यासाठी नुकसानकारक आहे किंवा नाही. वैज्ञानिक नताली तूफेंकजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे जाणून घ्यायचं होतं की, प्लॅस्टिक टी बॅग पेय पदार्थ अति सूक्ष्म कण सोडते का? याचं विश्लेषण करण्यासाठी अभ्यासकांनी चार वेगवेगळ्या प्रकारच्या टी बॅग खरेदी केल्या.
मायक्रोप्लॅस्टिकचे अरबो कण चहात
त्यांनी पॅकेटमधून चहा पावडर काढून ती धुतली आणि त्यानंतर त्याचा वापर केला. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीचा वापर केल्यावर टीमला कळालं की, एक प्लॅस्टिक टी बॅग चहा उकडतानाच्या तापमानावर पाण्यात साधारण ११.६ अरब मायक्रोप्लॅस्टिक आणि ३.१ अरब नॅनोप्लॅस्टिक कण सोडते.
दरम्यान, एका दुसऱ्या रिसर्चनुसार, प्लॅस्टिकच्या बॉटलच्या माध्यमातून कशाप्रकारे आपल्या शरीरात प्लॅस्टिक जातं हे काही दिवसांपूर्वीच रिसर्चमधून समोर आलं होतं. आता दुसऱ्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, एक व्यक्ती वर्षभरात ७३ हजार प्लॅस्टिकचे बारिक कण गिळंकृत करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ व्हियन्नाने हा रिसर्च केलाय. वैज्ञानिकांनुसार, व्यक्तीच्या शरीरात मायक्रोप्लॅस्टिक जाण्याचं मुख्य माध्यम समुद्री जीव आहेत. जे खाल्ले जातात. हे प्लॅस्टिक आतड्यांना संक्रमित करत आहे.