किडनीचे फिल्टर खराब झाले की रक्त होतं विषारी, या उपायांनी ठेवा सुरक्षित!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:33 PM2023-07-19T12:33:54+5:302023-07-19T12:34:28+5:30

Superfoods For Kidney: काही खाद्य पदार्थ खाऊन तुम्ही किडनी निरोगी ठेवू शकता. जर तुम्हाला यासंबंधी काही समस्या असेल तर या गोष्टींच्या मदतीने वेदनेसहीत इतर लक्षणांपासून सुटका मिळवू शकता.

Superfoods for kidney : Which foods clean and repair kidney | किडनीचे फिल्टर खराब झाले की रक्त होतं विषारी, या उपायांनी ठेवा सुरक्षित!

किडनीचे फिल्टर खराब झाले की रक्त होतं विषारी, या उपायांनी ठेवा सुरक्षित!

googlenewsNext

Superfoods For Kidney: अशुद्ध रक्त पूर्ण शरीरात विष पसरवू शकतं. रक्त खराब झालं तर त्यात विषारी पदार्थांच प्रमाण वाढतं. ते साफ करण्याचं काम किडनी करते. त्यामुळे किडनीचे फिल्टर नेहमीच स्वच्छ आणि फीट ठेवले पाहिजे. जर किडनीचे फिल्टर खराब झाले तर रक्ताची सफाई सुद्धा बंद होते.

अशात काही खाद्य पदार्थ खाऊन तुम्ही किडनी निरोगी ठेवू शकता. जर तुम्हाला यासंबंधी काही समस्या असेल तर या गोष्टींच्या मदतीने वेदनेसहीत इतर लक्षणांपासून सुटका मिळवू शकता. नॅशनल किडनी अकॅडमी फाउंडेशननुसार, किडनी निरोगी ठेवण्यासाठी खालील पदार्थ खाऊ शकता.

पत्ता कोबी आणि लाल शिमला मिरची

पत्ता कोबीमध्ये फायटोकेमिकल्स भरपूर असतात, जे किडनीला हेल्दी बनवू शकतात. तुम्ही याचा सूप किंवा सलाद बनवून खाऊ शकता. तेच लाल शिमला मिरचीला किडनीला नुकसान पोहोचवणाऱ्या पोटॅशिअमपासून वाचवते.

कोबी आणि लसूण

फ्लॉवर म्हणजे कोबी हाय व्हिटॅमिन फूड आहे. जी विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. जर याच्यासोबत अॅंटी-इन्फ्लामेटरी लसूण मिक्स केलं तर किडनीच्या आजाराचा धोका टळू शकतो.

ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी

ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी या दोन्ही बेरीज किडनीसाठी सुपरफूड मानल्या जातात. या दोन्हींमध्ये पोटॅशिअम भरपूर असतं आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं. हे अॅंटी-ऑक्सिडेंट किडनीच्या कोशिकांना निरोगी ठेवतात, जेणेकरून किडनीचं काम व्यवस्थित चालावं.

ऑलिव ऑइल आणि लाल द्राक्ष

ऑलिव्ह ऑइल हे किडनीसाठी फार हेल्दी तेल मानलं जातं. त्यात अॅंटी-इंफ्लामेटरी गुण असतात. याने किडनीवरील सूज कमी होते. तसेच लाल द्राक्षामधील फ्लेवेनोइड्स ब्लड क्लॉटचा धोका कमी करतात.

Web Title: Superfoods for kidney : Which foods clean and repair kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.