तुम्ही कमी उंचीला कमीपणा समजता? हे वाचल्यावर तुमचा विचार बदलेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:04 AM2018-12-31T10:04:25+5:302018-12-31T10:08:25+5:30

अनेकदा उंची कमी असलेल्या लोकांना त्यांच्या कमी उंचीमुळे खूपकाही ऐकावं लागतं. अनेकदा ते चारचौघांमध्ये गमतीचा विषय ठरतात.

The surprising health benefits of being short | तुम्ही कमी उंचीला कमीपणा समजता? हे वाचल्यावर तुमचा विचार बदलेल!

तुम्ही कमी उंचीला कमीपणा समजता? हे वाचल्यावर तुमचा विचार बदलेल!

Next

अनेकदा उंची कमी असलेल्या लोकांना त्यांच्या कमी उंचीमुळे खूपकाही ऐकावं लागतं. अनेकदा ते चारचौघांमध्ये गमतीचा विषय ठरतात. काही उंच लोक त्यांना आपल्या उंचीमुळे कॉम्प्लेक्स देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कमी उंची असणारे काही लोक हे त्यांच्या उंचीमुळे नेहमी चिंतेत असतात. त्यांच्या मनात एक कमीपणाची भावना तयार झालेली असते. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत, ज्याने कमी उंची असणाऱ्यांना उंचीमुळे कमीपणा नाही तर खासियत वाटायला लागेल. तुम्हीही कमी उंची ही तुमची कमजोरी समजत असाल तर हा विचार डोक्यातून काढून टाका.

काय आहे खासियत?

एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, उंच लोकांच्या शरीरात ब्लड क्लॉटिंग म्हणजेच रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता जास्त असते. आणि रक्ताच्या गाठी तयार झाल्याने लखवा, ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक या गंभीर समस्या होण्याचा धोका असतो. स्वीडन यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. अभ्यासकांचं असं मत आहे की, असं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होतं. म्हणजे यातून हे स्पष्ट होतं की, कमी उंची असलेल्या लोकांना लखवा, ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका कमी असतो. 

शोधात सांगितलं आहे की, गुरुत्वाकर्षणामुळे उंची लोकांच्या शरीरात रक्तप्रवाह वरपर्यंत पोहोचण्यास अडचण येते. उंचीमुळे उंच लोकांच्या शरीरात रक्त वाहिन्या जास्त असतात आणि त्यामुळे रक्त गोठण्यालाही जास्त जागा मिळते. हेच कारण आहे की, उंच लोकांच्या शरीरात ही समस्या होते. या आजाराला वेनस थ्रॉम्बोसिस म्हणून ओळखले जाते. 

जर या शोधाच्या आकडेवारीवर विश्वास ठेवायचा तर ५ फूट ३ इंचापेक्षा कमी उंच पुरुषांच्या आणि महिलांमध्ये, ६ फूट २ इंच उंचीच्या पुरुष आणि महिलांच्या तुलनेत याचा धोका ६५ टक्के कमी असतो. या शोधामध्ये लाखो लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यानंतर ही आकडेवारी समोर आली. तरीही सध्या याच्या तर्क-वितर्कांवर चर्चा सुरु आहे. त्यानंतर यावर ठामपणे काही सांगता येईल. 

पूर्णपणे काहीही स्पष्ट झालं नसलं तरी आता जे शोधातून समोर आलंय त्यावरुन तुम्ही तुमची कमी उंची कशाप्रकारे तुमची खासियत आहे. हे जाणून घेऊ शकता. कमी उंचीमुळे तुम्ही वरील आजारांपासून स्वत:ला दूर ठेवू शकता. त्यामुळे कमी उंचीबाबत मनात वाईट किंवा चुकीचे विचार आणणे बंद करा आणि स्वत:ला कमी समजू नका.

कमी उंचीमुळे अनेकांमध्ये एक नकारत्मक भावना आलेली बघायला मिळते. मात्र असा विचार करणे चुकीचे आहे. व्यक्तीच्या उंचीवर तो मोठा की, लहान हे ठरत नसतं तर त्याच्या कर्तुत्वाने तो मोठा होत असतो. त्यामुळे कमी उंचीचा कॉम्प्लेक्स मनातून काढून टाका.

Web Title: The surprising health benefits of being short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.