केळीच नाही तर केळीच्या सालीनेही मिळतात अनेक फायदे, वाचाल तर व्हाल अवाक्...!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 02:53 PM2024-01-26T14:53:27+5:302024-01-26T14:53:47+5:30
Banana Peels Benefits : सामान्यपणे सगळेजण केळी खाऊन त्याची साल फेकून देतात. अशात आज आम्ही तुम्हाला केळीच्या सालीचे फायदे सांगणार आहोत.
Banana Peels Benefits : केळी आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. अनेकजण हे माहीत नसूनही आवडीने केळी खातात. केळीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, केळीसोबतच केळीच्या सालीचेही आरोग्याला अनेक फायदे होतात. सामान्यपणे सगळेजण केळी खाऊन त्याची साल फेकून देतात. अशात आज आम्ही तुम्हाला केळीच्या सालीचे फायदे सांगणार आहोत.
पोषक तत्वांचं खजिना
केळीच्या सालीवर ज्या पांढऱ्या रेषा असतात त्यात व्हिटॅमिन बी6, बी12, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कार्बोहायड्रेट आढळतात. हे व्हिटॅमिन त्वचा आणि वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे यापुढे केळीची साल फेकण्याआधी विचार कराल.
चामखळी करा दूर
केळीच्या सालीने चामखीळ झालेल्या ठिकाणी घासले तर चामखळी दूर करण्यास याने मदत मिळते. त्यासोबतच नवीन येणाऱ्या मोसही येत नाहीत.
सुरकुत्यांपासून सुटका
केळीच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. याने त्वचेवरील सुरकुत्या घालवल्या जातात. केळीच्या सालीने सुरकुत्या असलेल्या त्वचेवर घासा, त्यानंतर पाण्याने ती जागा स्वच्छ करा. काही दिवस असे केल्याने तुम्हाला फरक दिसेल.
चमकदार दात
केळीच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज आढळतात, जे तुमच्या दातांचा पिवळेपणा आणि इतर डाग दूर करतात.
पिंपल्सपासून सुटका
जर तुम्हाला सतत पिंपल्सची समस्या होत असेल तर केळीची साल तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. कारण यात व्हिटॅमिन, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज अधिक प्रमाणात असतात. केळीची साल पिंपल्सवर हलक्या हाताने घासल्यास याचा फायदा दिसून येईल.