डिप्रेशनला बळी पडला होता सुशांत सिंह राजपूत; जाणून घ्या या डिप्रेशनची लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:24 PM2020-06-15T15:24:28+5:302020-06-15T15:29:10+5:30

नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखं टोकांच पाऊल उचलल्याच्या घटना तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला डिप्रेशनची लक्षणं आणि उपाय सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

Sushant sing rajput suicide in depression know the symptoms | डिप्रेशनला बळी पडला होता सुशांत सिंह राजपूत; जाणून घ्या या डिप्रेशनची लक्षणं आणि उपाय

डिप्रेशनला बळी पडला होता सुशांत सिंह राजपूत; जाणून घ्या या डिप्रेशनची लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

प्रसिद्ध सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, तो डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर स्पेशल डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. घरातून त्याच्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे आढळून आली आहेत. या घटनेमुळे सुशांतला असलेल्या मानसिक त्रासाबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. डिप्रेशनची समस्या उद्भल्यास तीव्र मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. 

याआधीही नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला डिप्रेशनची लक्षणं आणि उपाय सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. सध्या  कोरोनाच्या माहामारीत त्यामुळे नोकरी, आर्थिक प्रश्न, करिअर याबाबत अनेकांना ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ज्या लोकांच्या हातात इतके दिवस काम नव्हते. त्यांना सुद्धा अनेक मानसिक ताण-तणावाच्या स्थितीचा सामना कारावा लागत आहे.

लक्षणं

लहान लहान गोष्टींवरून राग येणं. तुम्ही दु:खी आहात याची जाणीवही तुम्हाला होत नाही. त्यावेळी तुम्ही डिप्रेशनमध्ये असता, मित्रमैत्रिणींपासून दूर राहणं, स्वत:ला एकटं समजणंही डिप्रेशन असू शकतं, जास्तवेळ झोपणं किंवा झोप न लागणं, भूक न लागणं, कोणाशीही बोलण्यची इच्छा न होणं, डोक्यात सतत वाईटसाईट विचार येणं, भीती वाटणं, कारण नसताना रडू येणं, अशक्तपणा जाणवणे, सतत डोकेदुखी ची समस्या होणे, ह्रदयाची धडधड वाढणे, अंगाला  घाम सुटणे. ही डिप्रेशनची लक्षणं आहेत.

उपाय  

ताण-तणावमुक्त राहण्यासाठी आपल्या मित्रांशी बोला, मनातील गोष्टी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. 

रोज आवडतं संगीत ऐका.  सकाळी ऑफिसला जाण्याआधी अथवा संध्याकाळी घरी आल्यावर तुमच्या आवडीची गाणी ऐका.

धावपळीत कधीकधी आपण आपल्या आवडी-निवडी विसरून जातो. कामातून वेळ मिळाल्यानंतर अथवा  सुटीच्या दिवशी एखादा छंद जोपासला तर त्यात तुमचे मन गुंतून राहू शकते.

कुटुंबाला वेळ द्या. काही समस्या असल्यास घरातील मोठ्या, अनुभवी व्यक्तींशी चर्चा करा. समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. ऑफिसचं काम आणि घरातील वेळ यात ताळमेळ ठेवा. ऑफिसचं काम घरी करू नका. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामातून वेळ काढून फिरायला जात राहा.त्यामुळे तुमचा मुड चांगला राहील. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने ताण तणाव कमी होण्यास मदत होते. नवीन विचारांना चालना मिळू शकते. तुम्हाला काही नवीन कल्पना सुचू शकतात. 

दररोज सकाळी नियमित व्यायाम किंवा  ध्यान करा. सुरूवातीला विचारांचा गोंधळ उडू शकतो. हळूहळू मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. 

काळजी वाढली! कोरोना विषाणूपासून वाचलेल्या लोकांना 'या' गंभीर आजाराचा धोका, तज्ज्ञांचा दावा

खुशखबर! 'या' आजाराच्या लसीने कोरोना विषाणूंचा होणार खात्मा; टळू शकतो मृत्यूचा धोका

Web Title: Sushant sing rajput suicide in depression know the symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.