'ही' गोष्ट कराल तर राहणार नाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, महिलांनी करू नये याकडे दुर्लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 10:48 AM2019-12-20T10:48:22+5:302019-12-20T10:52:45+5:30
जेव्हाही वजन कमी करण्याचा विषय येतो तेव्हा जास्तीत जास्त लोक चांगलं फिट दिसण्यासाठी किंवा आपलं सौंदर्य परत मिळवण्यासाठी वजन कमी करण्याचा विचार करताना दिसतं.
जेव्हाही वजन कमी करण्याचा विषय येतो तेव्हा जास्तीत जास्त लोक चांगलं फिट दिसण्यासाठी किंवा आपलं सौंदर्य परत मिळवण्यासाठी वजन कमी करण्याचा विचार करताना दिसतं. मात्र, वजन कमी केल्याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात. इतकेच नाही तर वजन कमी करून तुम्ही वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवू शकता आणि यात ब्रेस्ट कॅन्सरचाही समावेश आहे.
'या' वयातील महिलांना अधिक धोका कमी
जर्नल ऑफ नॅशनल कॅ्न्सर इन्स्टिट्यूट JNCI मध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर ५० पेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना वजन कमी केलं आणि ते कमी केलेलं वजन नियंत्रित ठेवतील तर अशा महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अनेक पटीने कमी असतो. रिसर्चमध्ये सहभागी टीमला असंही आढळलं की, ज्या महिलांनी वजन कमी केलं, त्या पोस्ट मेनॉपॉजल हार्मोन्सचं सेवनही करत नव्हत्या.
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होईल
याआधी झालेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले होतेकी, बॉडी मास इंडेक्स अधिक असेल तर याने पोस्टमेनॉपॉजल ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. पण असा एकही रिसर्च झाला नव्हता ज्यातून हे सांगितलं जाईल की, वजन कमी केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो किंवा नाही. हेच कारण आहे की, अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि हॉर्वर्ड टी एच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासकांनी हा रिसर्च करण्याचा विचार केला.
१.८० लाख महिलांवर रिसर्च
या रिसर्चसाठी अभ्यासकांनी ५० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या १ लाख ८० हजार महिलांची तपासणी केली. या रिसर्चच्या निष्कर्षातून समोर आले आहे की, वजन कमी केल्याने या वयातील महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अनेक पटीने कमी होतो.