झोपेत घाम येण्याची समस्या आहे का? वेळीच व्हा सावध; जाणून घ्या कारणं....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 11:23 AM2022-02-07T11:23:02+5:302022-02-07T11:24:49+5:30
Sweating while sleeping reason : मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्थितीला इडियोपॅथिक हायपरहायड्रोसिसचं रूपही मानलं जातं. चला जाणून घेऊ रात्री झोपेत घाम येण्याची वेगवेगळी कारणं....
Sweating while sleeping reason : अनेक लोकांना रात्री झोपेत घाम येतो. पण अनेकजण याकडे सामान्य बाब मानून दुर्लक्ष करतात. याला हलक्यात घेऊ नका. कारण हा संकेत गंभीर आजाराकडे इशारा करतो. अनेकदा काही औषधं घेतल्यानेही रात्री झोपेत घाम येतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्थितीला इडियोपॅथिक हायपरहायड्रोसिसचं रूपही मानलं जातं. चला जाणून घेऊ रात्री झोपेत घाम येण्याची वेगवेगळी कारणं....
हार्मोन इम्बॅलन्स - जर तुम्ही महिला असाल आणि ४० वयापेक्षा जास्त असाल तर मेनोपॉजच्या सरूवातीला रात्री तुम्हाला घाम येऊ शकतो. सरासरी शहरांमध्ये महिलांना ४६ व्या वयानंतर मेनोपॉजची सुरूवात होते. मेनोपॉज एकप्रकारचा हार्मोन्सचा रोलर-कोस्टर आहे. ज्यामुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. रात्री घाम येणं मेनोपॉजचं एक लक्षण आहे. हे नुकसानकारक नाही, पण झोपमोड होते.
अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टि्यूटनुसार, ब्रेस्ट कॅन्सरसोबत लढलेल्या महिलांमध्ये मेनोपॉजनंतर रात्री घाम येण्याची तक्रार राहते. कॅन्सर पीडित साधारण दोन तृतियांश महिलांमध्ये ही तक्रार आढळून आली. कॅन्सरच्या उपचारामुळेही मेनोपॉज होतो आणि अनेक केसेसमध्ये ही स्थिती रात्री घाम येण्याचं कारण ठरते.
याशिवाय हार्मोन्स इम्बॅल्नसची इतरही कारणे असतात. डायबिटीज, प्रेग्नेन्सी आणि एचआयव्ही इन्फेक्शन ज्याने झोपेत घाम येतो. भारतात डायबिटीजचे सर्वात जास्त रूग्ण आहेत. जर तुमच्या परिवारात कुणाला डायबिटीज राहिला असेल आणि तुम्हाला रात्री झोपेत घाम येत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
टीबी - टुबर्क्यूलोसिस म्हणजे टीबीचा प्रभाव सर्वात जास्त फुप्फुसांवर पडतो. तेच याच्या लक्षणांमध्ये रात्री घाम येणे, वजन कमी होणे आणि ताप येणे यांचा समावेश आहे. टीबीच्या केसेसमध्ये ४५ टक्के रूग्णांना रात्री घाम येतो.
कॅन्सर - कॅन्सर रिसर्च सेंटर यूकेनुसार, विशेषप्रकारच्या कॅन्सरमध्ये रूग्णाला रात्री घाम येतो. तज्ज्ञांनुसार, याचं कारण हे आहे की, जेव्हा शरीर कॅन्सरसोबत लढत असतं, तेव्हा इम्यून सिस्टीम इन्फेक्शनसारखी लक्षणं तयार करतो. या कारणाने रात्री घाम आणि ताप येतो. ल्यूकेमिया, लिम्फोमा, ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या रूग्णाला रात्रीही घामाची तक्रार राहते.
ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया - स्लीप एपनिया एकप्रकारचा आजार आहे. ज्यात रूग्ण झोपताना योग्य प्रकारे श्वास घेऊ शकत नाही. ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया किंवा OSA ने पीडित लोक जसे झोपतात किंवा आरामाच्या स्थितीत असतात, तेव्हा गळ्यात मांसपेशी श्वासनलिका ब्लॉक करतात. याचा प्रभाव शरीराच्या ऑक्सीजन सप्लायवर पडतो. हेच कारण आहे की, OSA चे रूग्ण रात्री अनेकदा जागतात.
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, OSA ने पीडित ३०.६ टक्के पुरू आणि ३३.३ टक्के महिलांना रात्री घामाची समस्या राहते. ते सामान्य पुरूष आणि महिलांमध्ये ही आकडेवारी ९.३ टक्के आणि १२.४ टक्के असते.
गॅस्ट्रोएसोफगियल रिफ्लक्स डिजीज (GERD) - गॅस्ट्रोएसोफगियल रिफ्लक्स डिजीज एक गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर आहे. ज्यात झोपताना अन्न नलिकेत तयार झालेलं अॅसिड पोटात जमा होतं. याने छातीत जळजळ होते आणि झोपताना घामही येतो.