स्विमिंग पूलच्या पाण्यातील मस्ती अशी पडू शकते महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 02:23 PM2018-05-22T14:23:47+5:302018-05-22T14:23:47+5:30
स्विमिंग पूलच्या पाण्यात बॅक्टेरिया असतात त्यामुळे डायरिया होऊ शकतो. त्यामुळे स्विमिंग पूलच्या पाण्यात मजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
(Image Credit: How Stuff Works)
रिक्रिएशनल वॉटर इलनेस(RWI) म्हणजेच पाण्यामुळे होणारे आजार हे दुषित पाण्याचा संपर्कात आल्याने, दुषित पाणी प्यायल्याने किंवा पाण्यात असलेल्या केमिकल्स तसेच जर्म्समुळे होतात. RWI मध्ये इन्फेक्शन्स, पोटाचे आजार, स्कीन, कान, डोळे, श्वसन यंत्रणा आणि न्यूरॉलॉजिकल इन्फेक्शन यांचा समावेश आहे. यात सर्वात कॉमन आजार डायरिया हा आहे. डॉक्टर नेहमी सांगतात की, स्विमिंग पूलच्या पाण्यात बॅक्टेरिया असतात त्यामुळे डायरिया होऊ शकतो. त्यामुळे स्विमिंग पूलच्या पाण्यात मजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
पाण्यातील मस्ती पडू नये महागात
कदाचित पाण्यातील मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेली ही ठिकाणे जसे स्विमिंग पूल, वॉटर पार्क हे तुम्ही समजता तितके सुरक्षित नसावे. या पाण्यामुळे तुम्हाला पोटदुखी, ओमेटिंग, त्वेचेवर जळजळ आणि केस गळणे अशा समस्या होतात.
या पाण्याने होऊ शकतो डायरिया
स्विमिंग पूलच्या पाण्यात अधिक बॅक्टेरिया असतात असं डॉक्टर सांगतात. त्यामुळे डायरिया होऊ शकतो. त्यामुळे या आजारांना दूर ठेवायचं असेल तर पाणी तोंडात जाऊ नये याची काळजी घ्या.
क्लोरीनने लगेच नाही मरत जर्म्स
अनेक लोकांचं असं म्हणनं आहे की, स्विमिंग पूलमधील पाण्यात क्लोरीन टाकल्याने पूलमध्ये असलेले जर्म्स लगेच नष्ट होतात. पण हे खरं नाहीये. काही किटाणू हे क्लोरीनमुळे नष्ट होत नाहीत.
पाण्यात जाण्याआधी काय करावे?
- स्विमिंग पूलमध्ये जाण्याआधी शॉवर घ्यायला हवं.
- जर काही दिवसांपूर्वीच तुम्ही डायरिया आजारातून बाहेत पडले असाल तर स्विमिंग पूलमध्ये जाऊ नका.
पाणी स्वच्छ असेल याची काळजी घ्या
- बाजारातून PH लेव्हल टेस्ट स्ट्रिप विकत घ्या आणि पाण्यात उतरण्याआधी पाण्याची PH लेव्हल एकदा चेक करा.
- याची गोष्टीची माहिती घ्या की, स्विमिंग पूलचे ऑपरेटर आवश्यक केमिकल्सच्या मदतीने नियमीत रुपाने पाणी स्वच्छ करतात का?
केसांच्या काळजीसाठी काय कराल?
- स्विमिंगनंतर शरीरावर रॅशेज, लाल डाग येतात किंवा स्किन ड्राय झाल्यास अॅंटी-इचिंग क्रिम किंवा मेंथॉल क्रिम लावा. 7 दिवसांपर्यंत रॅशेज ठिक झाले नाहीतर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- जर स्विमिंग पूलच्या पाण्यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन झाले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही दिवस चष्मा वापरा.
- पाण्यात क्लोरीनचं प्रमाण अधिक असल्यास केसगळतीची समस्या होऊ शकते. त्यामुळे पाण्यात जातांना स्विमिंग कॅपचा वापर करा.