डिजिटल उपकरणांचा 'असा' वापर ठरू शकतो जाडेपणाचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 10:05 AM2019-04-04T10:05:29+5:302019-04-04T10:17:28+5:30

तुम्ही स्मार्टफोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसारखे डिजिटल उपकरणे सतत बदलता? म्हणजे स्मार्टफोन वापरत असाल तर तो सोडून टॅबलेट वापरु लागता.

Switching between smartphone, PC and other digital devices increases the risk of obesity says a study | डिजिटल उपकरणांचा 'असा' वापर ठरू शकतो जाडेपणाचं कारण!

डिजिटल उपकरणांचा 'असा' वापर ठरू शकतो जाडेपणाचं कारण!

Next

(Image Credit : OTV)

तुम्ही स्मार्टफोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसारखे डिजिटल उपकरणे सतत बदलता? म्हणजे स्मार्टफोन वापरत असाल तर तो सोडून टॅबलेट वापरु लागता किंवा अचानक कॉम्प्युटर सुरु करून बसता. आता तुम्ही म्हणाल की, याने काय होतं? त्यात आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, याने वजन वाढतं तर तुमचा यावरही विश्वास बसणार नाही. पण हे आम्ही नाही एक रिसर्च सांगतो आहे. तुम्हीही असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा कारण अशाप्रकारच्या मल्टीटास्किंगमुळे वजन वाढू शकतं. 

(Image Credit : Naaju)

या रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोणताही विचार न करतात डिजिटल उपकरणांना मधेच स्वीच करत राहिल्याने आणि त्यावर काम करत राहिल्याने तुम्ही काहीना काही खाण्यासाठी आतुर होता. म्हणजे काहीतरी खाण्याची तुमची इच्छा होते. अशा स्थितीत तुम्ही स्वत:वर कंट्रोल करू शकत नाहीत. यामुळे जाडेपणा वाढण्याचा धोका अधिक असतो. 

(Image Credit : Freepik)

अमेरिकेच्या राइस यूनिव्हर्सिटीतील या रिसर्चचे मुख्य लेखक रिचर्ड लोपेज म्हणाले की, 'स्मार्टफोन्स, टॅबलेटसारखी उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या आजूबाजूच्या वातावरणात फार बदल झाला आहे. हा बदल अशावेळी अधिक झाला, ज्यावेळी अनेक भागांमध्ये जाडेपणाचा दरही अधिक वाढला आहे'.

(Image Credit : breakingmuscle.com)

जर्नल ब्रेन इमेजिंग अ‍ॅन्ड बिहेविअरमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये १८ ते २३ वयोगटातील १३२ लोकांना सहभागी करण्यात आलं होतं. यात अभ्यासकांनी लोकांच्या व्यवहाराचं निरीक्षण केलं आणि त्यांनी हेही पाहिलं की, किती लोकचा अयोग्य वापर करतात किंवा त्यांच्यात फोन चेक करण्याची तीव्र इच्छा जागृत होते. त्यासोबतच कामात अडथळा निर्माण करणाऱ्या बिहेविअरचंही निरीक्षण यावेळी करण्यात आलं.  

(Image Credit : Today Show)

या रिसर्चमधून समोर आलं की, ज्या लोकांना सर्वात जास्त स्कोर मिळाला त्यांचा बॉडी इंडेक्स(बीएमआय) वाढला होता आणि त्यांच्या शरीरात फॅटचं प्रमाणही अधिक होतं. त्यानंतर पार्टिसिपेंट्सचा एमआरआय करण्यात आला, ज्यात त्यांच्या ब्रेन फंक्शनची तपासणी केली गेली. 

(Image Credit : Medical Xpress)

अभ्यासकांनुसार, जेव्हा मीडियाचा मल्टिटास्कर्सना वेगवेगळ्या पदार्थांचे फोटो दाखवण्यात आले तेव्हा त्यांच्या ब्रेनचा तो भाग अ‍ॅक्टिव्ह झाला ज्याने त्यांना खाण्याची तीव्र इच्छा झाली. लोपेज म्हणाले की, जाडेपणाची वाढती समस्या आणि मल्टिमीडियाचा वाढता वापर पाहता अशाप्रकारचा अभ्यास करणं गरजेचं होतं. 

Web Title: Switching between smartphone, PC and other digital devices increases the risk of obesity says a study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.