सुजलेले पाय आणि जिभ पांढरी...शरीरात दिसतील 'हे' संकेत तर समजा काहीतरी गडबड आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 01:12 PM2024-01-26T13:12:44+5:302024-01-26T13:13:21+5:30
काही संकेत असेही असतात जे सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण असं करणं गंभीर ठरू शकतं. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच संकेतांबाबत सांगणार आहोत.
जेव्हाही कुणाची तब्येत बिघडते किंवा शरीरात काही गडबड होते तेव्हा शरीर काहीतरी संकेत देतं. अशात या संकेतांवर लक्ष देणं फार गरजेचं असतं. जेणेकरून त्यावर वेळेवर उपचार करता यावेत. उदाहरण द्यायचं झालं तर कुणाला ताप येत असेल तर त्यांना थंडी वाजते. सर्दी-खोकला-डोकेदुखी होऊ लागते. अशात काही संकेत असेही असतात जे सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण असं करणं गंभीर ठरू शकतं. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच संकेतांबाबत सांगणार आहोत.
चामखिळीचा रंग किंवा आकार बदलणं
एक्सपर्ट सांगतात की, शरीरावर चामखीळ होणं कॉमन गोष्ट आहे. पण जर यांचा आकार आणि रंग बदलत असेल तर हा त्वचेच्या कॅन्सरचा संकेत असू शकतो. ज्याला मेलेनोमा म्हणतात. नेहमी शरीरावर दिसणारी चामखीळ आणि तिळांवर लक्ष ठेवावं. यावर खाज, सूज, जखम, आकार आणि रंग बदलेला दिसला तर तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
असामान्य डोळे
डोळ्यांवरूनही आरोग्याची माहिती घेता येते. त्यासाठी डोळे नेहमीच डॉक्टरांकडे चेक करत रहा. जर तुमच्या डोळ्यांमध्ये पांढरे डाग दिसत असतील तर ते कॉर्नियल आर्कसचे संकेत आहेत जे फॅट जमा झाल्याने होतात. हा वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा संकेत असू शकतो. ज्यावर वेळीच उपचार केले नाही तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होऊ शकतो. जर तुम्हाला कमी दिसत असेल तर डायबिटीसचा संकेतही असू शकतो.
पांढरी जिभ
जिभ बाहेर काढा तिचा रंग बघा. जर जिभ गुलाबी असेल तर ठीक आहे. पण जर जिभेचा रंग पांढरा किंवा पिवळा दिसत असेल तर हा सीलिएक डिसीजचा संकेत असू शकतो. ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे. ज्यात शरीर ग्लूटेनला डायजेस्ट करत नाही आणि अशात ग्लूटेन फ्री पदार्थ खावेत. सोबतच याने पोषक तत्व अवशोषण करणंही रोखलं जातं. त्यामुळे या आजाराचा संकेत सगळ्यात आधी तुमच्या जिभेवर दिसतो.
सूजलेले पाय
जर तुमचे हात किंवा पाय सूजलेले असतील, त्वचेवर खाज येत असेल, तुम्हाला झोपण्यास समस्या होत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हाला किडनीसंबंधी काही आजार असू शकतो. किडनी जेव्हा योग्यपणे काम करत नाही तेव्हा शरीरा सोडिअम किंवा मिठाचं रिटेंशन वाढतं ज्यामुळे हात-पायांवर सूज येऊ शकते. शरीरात सोडिअम-पाण्याचं बॅलन्स ठेवण्यासाठी एक लिक्विट पदार्थ असतो ज्यामुळे असं होतं.
नखांवर रेषा
जर तुमच्या नखांवर पांढऱ्या लाईन्स दिसत असतील तर हे थायरॉईडसंबंधी समस्यांचं कारण असू शकतं. अनेकदा या रेषा कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन ए चं प्रमाण शरीरात कमी झाल्याचा संकेतही असू शकतात.