फूड पॉयजनिंग कशामुळे होतं आणि काय आहेत लक्षणे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 10:32 AM2018-08-25T10:32:20+5:302018-08-25T10:33:44+5:30
अनेकजण अनेकदा जे मिळेल ते घाईघाईने खातात. याचा परिणाम असा होतो की, त्यांना फूड पॉयजनिंग होतं. फूड पॉयजनिंगचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्वच्छता नसणे.
अनेकजण अनेकदा जे मिळेल ते घाईघाईने खातात. याचा परिणाम असा होतो की, त्यांना फूड पॉयजनिंग होतं. फूड पॉयजनिंगचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्वच्छता नसणे. याने तुम्हाला थकव्यासोबतच कमजोरी जाणवते. अशात काही खाणेही कठिण होऊन बसतं. पण ही साधारण वाटणारी समस्या गंभीर होऊ शकते. त्यामुळे यावर वेळेवर उपचार घेणे जास्त फायद्याचे ठरेल. फूड पॉयजनिंगची लक्षणे काय असतात हे जाणून घेऊया जेणेकरुन त्यावर दुर्लक्ष होणार नाही आणि तुम्ही वेळेवर उपचार घेऊ शकाल.
१) उलटी किंवा पोटदुखी
जर काही खाल्यानंतर उलटी किंवा पोटात दुखतं असेल तर सतर्क व्हा. हे फूड पॉयजनिंगमुळेही होऊ शकतं. अशावेळी जेवण केल्यावर किंवा काही खाल्यावर उलटी किंवा मळमळ होऊ शकते. जर बराच वेळ जाऊनही हा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२) डिहायड्रेशन आणि कमजोरी
लूज मोशनसोबत तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. म्हणजे तुम्हाला जास्त तहान लागेल आणि तोंड कोरडं पडेल. त्यासोबतच लघवी कमी येऊ शकते. त्यासोबतच तुम्हाला चक्कर, थकवा आणि कमजोरी जाणवू शकते.
३) ताप
फूड पॉयजनिंगनंतर तुमचं शरीर गरम होऊ लागतं आणि तुम्हाला ताप आल्यासारखं वाटू लागतं. म्हणजे जर तुम्हाला जास्त ताप आला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
४) लूज मोशन
अनेकदा फूड पॉयजनिंग झाल्यास लूज मोशन होण्याची शक्यता अधिक असते. जी दोन ते तीन दिवस राहू शकते.
५) पोटात गाठी येणे
जर काही खाल्यानंतर तुमच्या पोटात जोरात वेदना होत असतील आणि पोटाच्या आजूबाजूला गाठी आल्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.