पोटात खालच्या बाजूला दुखणं पडू शकतं महागात, ऑपरेशनची वेळ येण्याआधीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:11 AM2020-04-24T10:11:38+5:302020-04-24T10:17:05+5:30
अनेकदा पोटदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या आजारांचा धोका असू शकतो.
पोटात दुखण्याची समस्या अनेकांना जाणवत असते. अनियमीत खाण्याच्या वेळा, जंक फुड, तेलकट आणि मैद्याचे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाल्याने पोटाच्या समस्या उद्भवतात. एसिडिटी, पोट साफ न होणं, अजीर्ण, गॅस होणं, यामुळे पोटात दुखण्याची समस्या निर्माण होते. पण अनेकदा पोटदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या आजारांचा धोका असू शकतो.अपेडिक्सची लक्षणं पोटातूनच दिसायला सुरूवात होते.वेळेवर उपचार केले नाही तर जीवघेणं ठरू शकतं. जर तुम्हाला या जीव घेण्या आजारापासून वाचायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अपेडिक्सच्या समस्येची लक्षणं सांगणार आहोत.
काय आहे अपेडिक्स
अपेंडिक्स आपल्या आतड्यांचा एक छोटासा भाग असतो. हा एका पातळ आणि छोट्या ट्यूबसारखा असतो. याची लांबी २ ते ३ इंच असते. अपेंडिक्सला दोन तोंड असतात. एक बंद असतं तर दुसरं उघडं असतं. जर या उघड्या तोंडातून अन्न अपेंडिक्समध्ये गेलं तर ते बाहेर येऊ शकत नाही. ज्यामुळे अंपेडिक्समध्ये इन्फेक्शन होऊ लागतं आणि पोटात वेदना होऊ लागतात.
अपेंडिक्सवर सूज येण्याची दोन कारणे असू शकतात. एक इन्फेक्शन आणि दुसरं म्हणजे अपेंडिक्समध्ये काही फसल्यानेही होते. तसेच डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थांची कमतरता हेही एक मुख्य कारण असू शकतं. आतड्यांच्या कॅन्सरमुळेही अपेंडिक्सची समस्या होऊ शकते. ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते, पण १० ते ३० या वयात ही समस्या होण्याची शक्यता अधिक असते.
लक्षणं
सतत गॅस होणं
अनेकांना गॅसची समस्या सतत जाणवत असते. बटाटा, वाटाणे, ब्रेड, असे पदार्थ सतत खाण्यात आल्यामुळे गॅसची समस्या उद्भवते. तुम्हाला पोटात गॅस तयार होण्यासोबतच पोटात सतत दुखत असेल आणि गॅस पास झाल्यावरही तुम्हाला आराम वाटत नसेल तर हे अपेंडिक्सतं लक्षण असू शकतं.
पोट साफ न होणं, लूज मोशन
तुमचं पोट साफ नसेल, तर कधी लूज मोशन होत असेल किंवा कधी डायरिया होत असेल हे सुद्धा अपेंडिक्सचं लक्षण असू शकतं. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये अपेडिंक्सची वेगवेगळी लक्षणे बघायला मिळू शकतात. अशी समस्या उद्भवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ( हे पण वाचा- लॉकडाऊनमध्ये घरात बसून झोप येत नाहीये? चांगल्या झोपेसाठी वापरा 'या' टिप्स....)
हालचाल करणं कठीण होतं
अपेंडिक्समुळे पोटात होणाऱ्या वेदना या थोडा वेळ बेडवर झोपल्याने किंवा शांतपणे बसून राहिल्याने दूर होते असं नाही. या वेदना सतत होत राहतात आणि कशाप्रकारची शारीरिक हालचाल केली तर वेदना अधिक वाढतात. अनेकदा खोकला आल्यावर आणि शिंकल्यावरही पोटात जोरदार वेदना होतात. ( हे पण वाचा-आधीच कोरोनामुळे लॉकडाऊन; घरी बसून लोक होत आहेत 'या' गंभीर आजारांचे शिकार)