महिलाच नाही, तर पुरुषसुद्धा होत आहेत यीस्ट इन्फेक्शनचे शिकार; वाचा लक्षणं आणि उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 03:56 PM2020-05-01T15:56:40+5:302020-05-01T16:10:47+5:30
यीस्ट संक्रणापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
(image credit- Bustle)
उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो. आपण आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर वेगवेगळ्या आजारांना आपण नकळत निमंत्रण देत असतो. सध्या असाच एक आजार सगळीकडे झपाट्यानं पसरतो आहे. यीस्ट संक्रमण साधारणपणे महिलांची समस्या आहे, असं समजलं जात. पण कँडिडा अल्बिकन्समुळे पुरुष सुद्धा संक्रमणाचे शिकार ठरू शकतात.
हे संक्रमण तोंडावर, त्वचेवर, केसांमध्ये विकसीत होत जातं. सर्वाधिक महिला या समस्येने हैराण असतात. अशीच समस्या पुरुषांना सुद्धा उद्भवते. आज आम्ही तुम्हाला या यीस्ट संक्रमणापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे संक्रमणाचा धोका टाळता येऊ शकतो.
लक्षणं
लघवी करताना जळजळ होणं
प्रायव्हेट पार्ट्सवर दुर्गंधी येणं
सतत खाज येणं.
प्रायव्हेट पार्ट्सवर चट्टे पडणे.
उपाय
टी ट्री ऑईल
यीस्ट इंफेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही चहाच्या पानांच्या तेलाचा वापर करू शकता. अनेक रिसर्चमध्ये दिसून आलं आहे की चहाच्या पानांच्या तेलात अँटीप्रोटोजोअल, अँटिफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हे गुणधर्म इन्फेक्शचा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या तेलाचा वापर इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी करून आराम मिळवू शकता.
दही
दही आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. दह्याचे अनेक फायदे तुम्हाला माहीत असतील. दही एक नैसर्गीक प्रोबायोटीक आहे. दह्याच्या सेवनाने शरीरातील सकारात्मक बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे कँडिडा इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
तुरटी
यीस्ट इन्फेक्शनमध्ये सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुरटी. तुरटीचं पाणी इन्फेक्शन झालेल्या जागी लावावं ते पुसून टाकू नये. आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी.
नारळाचं तेल
इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी तेल लावून मालिश करावी. दालचिनीचं तेल आणि खोबरेल तेल दोन्ही समप्रमाणात घेऊन लावावं. मात्र सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला चालेल असं नाही त्यामुळे डॉक्टरांनी तेल लावू नये असं सांगितलं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लसूण
अॅन्टीफंगल म्हणून लसूण काम करतं. ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणीच्या पाकळ्यांचा रस काढून ते तेल लावावं किंवा आहारात लसणाचा समावेश करून सुद्धा तुम्ही इन्फेक्शनला दूर ठेवू शकता. ( हे पण वाचा-छातीत दुखणं ठरू शकतं जीवघेणं, एंजायनामुळे येणारा हार्ट अटॅक टाळण्याासाठी वापरा 'हे' उपाय)
एलोवेरा
एलोवेराचा गर काढून तो इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे खाज सुटणार नाही. त्वचेची आग होणार नाही. कोणताही साबण किंवा केमिकल असलेल्या क्रीम त्वचेवर लावू नका. कारण त्यामुळे त्वचेचं नुकसान होऊन इन्फेक्शन वाढू शकतं. (हे पण वाचा-कोरोनाच नाही इतरही आजारांना निमंत्रण देऊ शकतो उन्हाळा; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा)