'ही' आहेत सायलेन्ट हार्ट अटॅकची लक्षणं; अजिबात दुर्लक्षं करू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 03:04 PM2019-08-16T15:04:16+5:302019-08-16T15:10:15+5:30
जर तुम्हाला हार्ट अटॅक येणार असेल तर तुम्हाला कसं समजेल? छातीमध्ये प्रचंड वेदना होणं, तुम्हाला फार खोकला येईल आणि पुन्हा जमिनीवर जाऊन पडाल. असं आपण अनेकदा चित्रपटांमध्ये पाहतो. परंतु अनेकदा हार्ट अटॅक अचानक कोणतंही लक्षणं न दिसताही येतो.
जर तुम्हाला हार्ट अटॅक येणार असेल तर तुम्हाला कसं समजेल? छातीमध्ये प्रचंड वेदना होणं, तुम्हाला फार खोकला येईल आणि पुन्हा जमिनीवर जाऊन पडाल. असं आपण अनेकदा चित्रपटांमध्ये पाहतो. परंतु अनेकदा हार्ट अटॅक अचानक कोणतंही लक्षणं न दिसताही येतो. त्यामुळे गरजेचं आहे की, तुम्ही वेळोवेळी तुम्ही हेल्थ चेकअप करून घ्यावं. डायबिटिस, हायपरटेन्शन आणि लठ्ठपणाच्या समस्यांनी त्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका फार कमी असतो.
अनेक लोकांना असं वाटतं की, जेव्हा हार्ट अटॅक येईल, तेव्हा त्यांना छातीमध्ये प्रचंड वेदना होतील. त्यामुळे हार्ट अटॅक येत असल्याचं समजण्यास त्यांना मदत होईल. परंतु, अनेकदा हार्ट अटॅक कोणत्याही लक्षणाशिवाय अचानक येतो. याला सायलंट हार्ट अटॅक असं म्हणतात. पण घाबरू नका, अशातच अनेक अशी लक्षणं येतात.
का येतो सायलेन्ट हार्ट अटॅक ?
लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि डायबिटिसमुळे व्यक्तीला हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो. परंतु, सायलंट हार्ट अटॅकमध्ये व्यक्तीला काय करावं हेच समजत नाही. सायलेन्ट अटॅक येण्याआधी व्यक्तीच्या शरीरामध्ये फार बदल घडून येतात. ज्याकडे आपण दुर्लक्षं करू करतो. अनेकदा यामुळे जीवही गमवावा लागू शकतो. अशातच आवश्यक आहे की, शरीरामध्ये होणार्या बदलांकडे वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे.
जाणून घेऊया सायलेन्ट हार्ट अटॅकची लक्षणं :
छातीमध्ये प्रेशर जाणवणं...
जर तुमच्या आर्टरीमध्ये ब्लॉकेज असतील तर तुम्हाला छातीमध्ये प्रेशर जाणवू लागतं. अशी लक्षणं तुमच्यामध्ये दिसून आली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.
खांदा दुखणं
छातीमध्ये प्रचंड वेदना होणं आणि हळूहळू संपूर्ण खांदा आणि हात दुखणं हार्ट अटॅकचं लक्षण आहे. अनेकदा छातीमध्ये वेदना होत नसतात आणि फक्त खांदा दुखत असतो.
अचानक अशक्तपणा येणं
जर तुम्हाला अचानक चक्कर येऊ लागली किंवा अचानक तुम्हाला अशक्त वाटू लागलं आणि उभं राहणंही अशक्य असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जबड्यामध्ये वेदना होणं
अनेकदा जबड्यामध्ये किंवा गळ्यामध्ये थंड आणि सेन्सिटिविटीमुळे वेदना होऊ लागतात. परंतु, जर छातीमध्ये वेदना होऊ लागल्या आणि त्या जबड्यापर्यंत पोहोचल्या तर हार्ट अटॅकचं लक्षणं असू शकतं.
पाय आणि टाचांमध्ये वेदना
जर तुमच्या पायांना सूज आली असेल, तर याचा अर्थ आहे की, हार्ट व्यवस्थित ब्लड पंप करू शकत नाही आहे. हार्ट फेल्युअरआधी किडनीदेखील कमजोर होऊ लागते. ज्यामुळे पायांना सूज येऊ लागते. या लक्षणाकडे दुर्लक्षं करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेल्दी हार्टसाठी फॉलो करा हे नियम
आपल्या सर्वांना माहीत आहे. काही पदार्थ आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी घातक असतात. पण हे जीभेच्या चवीसाठी अत्यंत घातक असतात. आरोग्य राखण्यासाठी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, कोणते खाद्यपदार्थ तुमच्यासाठी फायदेशीर आहेत आणि कोणते नाहीत...
ताजी फळं
सफरचंद, डाळिंब, आंबे इत्यादी फळांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात. जे हृदयाचं आरोग्य हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. हार्ट हेल्दी ठेवण्यासोबतच फळाचं सेवन चेहरा उजळवण्यासाठी आणि दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यासाठी मदत करतात.
भाज्यांचं सलाड
भूक लागल्यानंतर काही भाज्या जसं गाजर, टोमॅटो तुम्ही कच्चंही खाउ शकता. स्नॅक्सच्या स्वरूपात बाहेरील इतर पदार्थ खाण्याऐवजी या पदार्थांचं सेवन करा.
बदाम
बदामामध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असतं. जे कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचं काम सुरळीत करण्यासाठी मदत करतं. तसेच बदाम तुमच्या मेंदूचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतात.
खाण्यावर नियंत्रण ठेवा
लाइफटाइम फिट राहण्यासाठी नेहमी आपल्या भूकेपेक्षा कमी खा. हा नियम फक्त हेल्दी हार्टसाठीच नाहीतर संपूर्ण शरीरासाठीच फायदेशीर ठरतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.