फुफ्फुसांच्या आजारांचं कारण ठरू शकतं चेस्ट इन्फेक्शन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 11:12 AM2020-05-13T11:12:15+5:302020-05-13T11:14:03+5:30

छातीत होणारं संक्रमण हे श्वासांशी संबंधीत आजारांचं आहे.

Symptoms and remedies of chest infection or lungs disease myb | फुफ्फुसांच्या आजारांचं कारण ठरू शकतं चेस्ट इन्फेक्शन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

फुफ्फुसांच्या आजारांचं कारण ठरू शकतं चेस्ट इन्फेक्शन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. खासकरून महिलांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. लहान समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचं रुपांतर मोठ्या आजारात होतं. चेस्ट इन्फेक्शन ही सुद्धा अशीच समस्या आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये सुका खोकला, भीती वाटणं, दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं. छातीत दुखणं, ताप, डोकेदुखी यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो. छातीत होणारं संक्रमण हे श्वासांशी संबंधीत आजारांचं आहे. या संक्रमणात फुप्फुसांचा समावेश असतो.  त्यात ब्रोकायटीस आणि निमोनिया या आजारांचा समावेश आहे.

बॅक्टेरिअल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे चेस्ट इन्फेक्शन होऊ शकतं.  ब्रॉकायटिस व्हायरसच्या संक्रमणामुळे होतो. तर निमोनिया बॅक्टेरिअल संक्रमणामुळे होतो. चेस्ट इन्फेक्शनेग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या  खोकण्यातून किंवा शिंकण्यातून तसंच इन्फेक्टेड ड्रॉपलेट्सच्या संपर्कात आल्यामुळे या आजाराची लागण होऊ शकते.

या व्यतिरिक्त व्हायरस किंवा बॅक्टेरियांचे संक्रमण झालेल्या जागेवर स्पर्श केल्यास हे संक्रमण पसरू शकते. वयस्कर लोक, गरोदर महिला, लहान मुलं, धुम्रपान करत असेलेल्या लोकांना  हे आजार होण्याची शक्यता असते.  क्रोनिक ओब्‍स्‍ट्रक्टिव पल्मोनरी डिस्‍ऑर्डर, अस्‍थमा  किंवा डायबिटीज  रुग्णांना या संक्रमणाचा धोका जास्त असतो. 


 

चेस्ट इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी घरगुती उपाय

ताप कमी करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी इबूप्रोफेन किंवा एसिटामिनोफेन डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येऊ शकते. 

छातीत जमा झालेले कफ बाहेर काढण्यासाठी कफ निस्सारण औषधं घ्या.

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या.

गरम पाण्याची वाफ घ्याय.

खोकला जास्त आल्यामुळे घसा खवखवतं असेल तर पाण्यात मध आणि लिंबू घालून प्या.

धुम्रपान करू नका, धुम्रपान करत असलेल्या व्यक्तीपासून लांब राहा. 

खोकला येऊ म्हणून औषध घेऊ नका, कारण त्यामुळे फुप्फुसांमध्ये कफ अडकून राहण्याची शक्यता असते. 

बचावाचे उपाय

संतुलित आहार घ्या. जेणेकरून तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहील

स्वच्छता ठेवा. हात पाय न धुता तोंडाला स्पर्श करू नका. 

धुम्रपान आणि मद्यपानापासून लांब राहा.

खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरा.

(आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या)

(चिंताजनक! 'या' लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त; आयसोलेशनसाठी १४ दिवस पुरेसे नाहीत)

Web Title: Symptoms and remedies of chest infection or lungs disease myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.