वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन होण्याआधीच व्हा सावध, काय आहेत लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 10:22 AM2020-02-02T10:22:23+5:302020-02-02T10:34:39+5:30

अनेकदा महिलांना त्यांच्या प्राव्हेट पार्टसवर वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात.

Symptoms and Remedies Before Vaginal Bacterial Infection | वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन होण्याआधीच व्हा सावध, काय आहेत लक्षणं आणि उपाय

वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन होण्याआधीच व्हा सावध, काय आहेत लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

(image credit- hellowsehat.com)

 महिलांना त्यांच्या प्राव्हेट पार्टसवर वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. अनेकदा अशा समस्यांकडे  दुर्लक्ष केल्यामुळे मोठे आजार सुद्धा होऊ शकतो. खाज येणे, त्वचा लाल होणे, लहान आकाराच्या पुळ्या येणे अशा समस्या उद्भवत असतात. कारण रोजचे जीवन जगत असताना अनेक महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही.  जर तुम्हाला सुद्धा अनेकदा अशा त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन बद्दल माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्हाला वेळीच या आजाराबद्दल कळल्यास स्वतःला आजारांपासून लांब ठेवता येईल.

वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शनचा आजार उद्भवल्यास वजायनामध्ये सुज येण्याची आणि त्वचा  लाल होण्याची समस्या सुद्धा उद्भवत असते. या इन्फेक्शनला यीस्ट इंफेक्शन असं सुद्धा म्हण्तात. यामध्ये त्वचेवर एका प्रकारची बुरशी लागत असते. त्याला  कॅंडिडा अल्बीकन्स (Candida albicans)  असं म्हणतात. बॅक्टेरीयल वजायनल इन्फेक्शन हा आजार महिलांमध्ये खूपच कॉमन दिसून येतो. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील महिलांना या आजाराचा धोका जास्त असतो.  असंतुलित आहार आणि झोप व्यवस्थीत न झाल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते.लठ्ठपणा आणि मधूमेह असल्यास हा आजार जास्त होण्याची शक्यता असते.

लक्षणं

वजायनामध्ये खाज येणे. 

व्हाईट डिस्चार्ज होणे. 

लघवी करताना जळजळ होणे.

शरीरसंबंधा दरम्यान जळजळ होणे. 

वजायनाला सूज येणे. ( हे पण वाचा-'या' ४ कारणांमुळे सतत लघवी येऊन अर्ध्या रात्री होतं झोपेचं खोबरं!)

वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शनपासून वाचण्याचे उपाय

जर तुम्हाला अशी लक्षणं जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

नियमीत दह्याचे सेवन करा. त्यातील  एसिडोफिलिक हे खूप लाभदायक ठरत असतं. 

घट्ट कपडे घालू नका. कारण घट्ट कपडे घातल्यामुळे शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आजार होण्याची शक्यता असते. 

बॅक्टेरीयल वजायनल इन्फेक्शन रोखण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या. दिवसातून ८ ते ९ ग्लास पाणी प्या. तुम्ही जितकं जास्त पाणी प्याल तितकं मुत्राद्वारे इन्फेक्शन बाहेर पडण्याल मदत होईल. 

मादक पदार्थांचे सेवन करू नका. तसंच चहा कॉफीचं सेवन सुद्धा कमी करा. कारण जर तुम्हाला हे इन्फेक्शन झालं असेल आणि तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर आजार बरा होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असते.

व्हिटामिन सी एक एंटीऑक्सिडेंट आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा लाभदायक ठरत असतं.जर तुम्ही व्हिटामीन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करत असाल तर वजायनल इन्फेक्शन बरं होण्यासाठी लाभदायक ठरेल. ( हे पण वाचा-ऑफिस किंवा घरी कुठेही पोट फुगण्याला जबाबदार ५ कारणे, वेळीच बदला 'या' सवयी!)

Web Title: Symptoms and Remedies Before Vaginal Bacterial Infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.