अंगावरून पांढरं पाणी जातंय? असू शकतो गर्भाशयाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 10:09 AM2020-01-19T10:09:35+5:302020-01-19T10:13:09+5:30

सध्याच्या काळात महिलांना अनेक प्रकारच्या  समस्यांना सामोरे जावे लागते.

Symptoms and solutions of uterus cancer and white discharge | अंगावरून पांढरं पाणी जातंय? असू शकतो गर्भाशयाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

अंगावरून पांढरं पाणी जातंय? असू शकतो गर्भाशयाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

सध्याच्या काळात महिलांना अनेक प्रकारच्या  समस्यांना सामोरे जावे लागते. शारीरिक आणि मानसीक ताण असल्यामुळे महिलांना सतत आजार किंवा लहान मोठ्या  समस्या उद्भवत असतात. पण या समस्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हे आजार जीवघेणे सुद्धा ठरू शकतात.  बदलत्या जीवनशैलीत महिलांना आपल्या प्राईवेट पार्टशी संबंधीत समस्या उद्भवत असतात.  आज  आम्ही तुम्हाला महिलांना होत असलेल्या जीवघेण्या  आजारापासून कसं वाचता येऊ शकतं हे सांगणार आहोत.


योनीतून होणारा स्त्राव (वजाइनल डिस्चार्ज)

जेव्हा मुली तरूण अवस्थेत असतात. तेव्हा त्यांच्यासमोर अनेक प्रकारच्या समस्या असतात. त्यातीलच एक म्हणजे  योनी मार्गातून स्त्राव होत असतो. त्याला वजायनल ड़िस्चार्ज असं म्हणतात.  जाडसर स्त्राव मुलींच्या योनी मार्गातून होत असतो. त्यांना लॅक्टोबसील म्हणतात. योनी मार्गातून इन्फेक्शन होऊन प्राईव्हेट पार्टसच्या इतर भागांना सुद्धा त्रास होऊ शकतो. योनीतून होणारा स्त्राव ही खूप सामान्य बाब आहे. योनी स्वच्छ ठेवण्यासाठी हा स्त्राव होत असतो. पण काहीवेळा पांढरा रंग असलेला पातळ स्त्राव व्हायला सुरूवात होते. हे घातक सुद्धा असू शकतं. 

Related image
असामान्य योनि स्राव

काहीवेळा  योनीतून स्त्राव होत असताना तो अबनॉर्मल सुद्धा असू शकतो. त्यामुळे योनीचा रंग बदलतो आणि  अंग जड वाटायला सुरूवात होते. अनेकदा इन्फेक्शन झाले असेल तर योनीतून बाहेर पडत असलेल्या पदार्थाचा रंग सुद्धा बदलू शकतो.

Related image
असू शकतो कॅन्सरचा धोका

जर पांढरा स्त्राव योनीमार्गीतून होत असताना  अवयवांना सुज येत असेल तर तुम्हाला  काहीतरी गंभीर आजार यसल्याची ही लक्षण आहेत. पांढरं पाणि अंगावरून जाणे या गोष्टीला अनेक महिला  सिरीयसली घेत नाहीत. त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.(हे पण वाचा-आनंदी राहण्याचा फंडा काय आहे? हा तुम्हाला समजला तर जीवनात कधीच येणार नाही निराशा!)

Related image
लक्षणं

योनीस्त्राव होत असताना प्रायव्हेट पार्टसवर खाज येणे.

पांढरा रंग असलेला जाडसर स्त्राव होणे.

अवयवांना सुज येणे.

सतत लघवी येणे.

लघवी करत असताना वेदना होणे.

रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे, फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे किंवा मधुमेह असेल तरी योनीमार्गीतून स्त्राव होत असतो. (हे पण वाचा-हिवाळ्यात आळसावलेले राहू नका, जागे व्हा आणि पुढे जात राहा!)

Related image
उपाय

प्राईव्हेट पार्टस स्वच्छ आणि  कोरडे ठेवा, 

शरीरसंबंधादरम्यान कॉंडमचा वापर करा. 

जर तुम्हला डायबिटिस असेल तर आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवा.

शक्य असल्याल दररोज व्यायाम करा आणि स्वतःला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. 

काहीवेळा या आजाराकडे दुर्लक्ष करणं महागात सुद्धा पडू शकतं. कारण यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.पांढरं पाणी तसंच त्यामुळे होणारा त्रास याकडे दुर्लक्ष केल्यास  हळू हळू अशक्तपणा जाणवायला सुरूवात होते. तसंच आळस येतो. या आजारापासून बचाव करायचा असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. 

Web Title: Symptoms and solutions of uterus cancer and white discharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.