काय असते पोटाचा अल्सर ही समस्या? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 03:52 PM2023-06-30T15:52:36+5:302023-06-30T15:53:27+5:30

Stomach Ulcer : अनियमित लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे अल्सरची समस्या होते. पोटात फोडं होतात आणि ते फुटल्यावर त्याच्या जखमा तयार होतात.

Symptoms & Causes of Peptic Ulcers you should know | काय असते पोटाचा अल्सर ही समस्या? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे....

काय असते पोटाचा अल्सर ही समस्या? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे....

googlenewsNext

Stomach Ulcer : तोंडात तर अनेकदा फोड येतात, या फोडांना अल्सर असं म्हणतात. या फोडांबाबत तर तुम्हाला माहीत असेलच. पण अनेकांना हे माहीत नाही की, तोंडासारखं पोटातही अल्सर होतं. म्हणजे पोटातही फोडं येतात आणि ते फार घातक ठरू शकतात. 

पोटातील अल्सर हे छोट्या आतड्यांच्या सुरूवातीच्या भागात किंवा म्यूकलवर होतात. याची काही मुख्य कारणं पोटात अ‍ॅसिडचं प्रमाण वाढणं, चहा, कॉफी, सिगारेट आणि मद्यसेवन हे आहेत. त्यासोबतच जास्त आंबट खाणे, मसालेदार खाणे आणि गरम पदार्थ खाणे यानेही पोटात अल्सर होतात. 

पोटाच्या अल्सरची लक्षणे?

1) पोटाच्या वरच्या भागात वेदना - अल्सरची समस्या झाल्यावर पोटाच्या वरच्या बाहेरील भागात वेदना होऊ लागतात. अल्सरमध्ये जेवण केल्यावर पोटात वेदना होतात. तसेच पोट रिकामं असेल तरी वेदना होतात. या स्थितीत अन्न नलिकेच्या खालच्या भागात फोडं येतात. कधी-कधी अन्न नलिकेला छिद्रही पडतं.

2) अ‍ॅसिड तयार होणं - आपण जेव्हा काही खातो तेव्हा पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. याने अन्न पचन होत असतं. कधी कधी पोट खराब झाल्यावर हे अ‍ॅसिड वर अन्न नलिकेत जातं आणि जळजळ वाटू लागते. याचा प्रभाव घशात, दातांवर, श्वासांवर पडू लागतो. यानेच तोंडातही फोडं येतात. 

3) वजन कमी होणे - पोटाच्या अल्सरने ग्रस्त लोकांचं वजन फार वेगाने कमी होऊ लागतं. याचं कारण म्हणजे अल्सर झाल्यार व्यक्ती खाण्याबाबत उदासीन होतो. त्यामुळे वजन कमी होऊ लागतं. त्यासोबतच अन्न पचनही होत नसल्याने वजन कमी होऊ लागतं.

4) अ‍ॅसिडिटीची समस्या - अल्सरमुळे छातीत दुखण्याची समस्याही होते. या वेदना अॅसिडिटी रिफ्लेक्शनमुळे होतात. हृदयात होणाऱ्या वेदना या छातीच्या वरच्या भागात होतात आणि कधी कधी अॅसिडिटीमुळे त्याच जागी वेदना होतात. त्यामुळे यात फरक करणे कठीण होऊन बसतं.

5) रक्ताची उलटी - अल्सरमध्ये असं आढळतं की, उलटी होते किंवा उलटीसारखं वाटतं. जेव्हा अल्सर वाढतो तेव्हा त्रास आणखी वाढतो. कधी कधी उलटीतून रक्तही येऊ शकतं. अशात विष्ठेचा रंगही काळा होतो.

Web Title: Symptoms & Causes of Peptic Ulcers you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.