अतिचिंता म्हणजे मृत्यूला आमंत्रण, जाणून घ्या पॅनिक अटॅकची लक्षणं, कारणं आणि उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:57 AM2021-09-14T11:57:57+5:302021-09-14T12:00:01+5:30
कोरोनामुळे पॅनिक अटॅकच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या मागील कारणं आणि यापासून बचाव करण्यासाठी काय उपाय. करता येतील हे जाणून घेऊया. जाणून घेऊया.
भीती, चिंता वाटणे अतिशय साहजिक आहे. पण काही लोक जेव्हा याविषयी सतत विचार करतात किंवा त्रस्त राहतात, तेव्हा पॅनिक अटॅकची शक्यता वाढते. कोरोनामुळे अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या मागील कारणं आणि यापासून बचाव करण्यासाठी काय उपाय. करता येतील हे जाणून घेऊया. जाणून घेऊया.
पॅनिक अटॅक म्हणजे काय ?
पॅनिक डिसरऑर्ड ही एक अशी मनः स्थिती आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्ती भिती आणि चिंतेखाली वावरत असते. अशा व्यक्ती काहीवेळेस इतक्या घाबरतात की, त्यांना आपल्याला एखादा मोठा आजार झालाय किंवा एखाद्या मोठ्या समस्येने ग्रासल आहे, असं वाटतं. त्या व्यक्तीचं हृदय वेगाने धडधडू लागली. पीडित व्यक्तीला असे वाटते की, त्याच्याबरोबर चुकीचं काहीतरी घडतंय.
चिंता मोठं कारण
पॅनिक अटॅक सामान्यत: त्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरतो, ज्या खूप जास्त चिंता करतात किंवा ज्यांच्या कुटुंबात एखादी व्यक्ती मानसिक स्थितीने ग्रस्त असते. त्या व्यक्तींना पॅनिक अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. अशा व्यक्तींना प्रत्येक दुसऱ्या क्षणी आता माझं कसं होणार? ही चिंता सतावते. त्यांना भीती वाटणे, घाम येणे, हाता-पायांमध्ये झिणझिण्या येणे, श्वास घेण्यास समस्या अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. पॅनिक अटॅकचा कालावधी दहा मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ असू शकतो. याची लक्षणं साधारण हार्ट अटॅक प्रमाणे असतात.
पॅनिक अटॅकवर उपाय काय?
पॅनिक डिसऑर्डर च्या इलाजासाठी आपल्या आहारामध्ये बदल करा. तुम्ही कॉगनेटिव्ह बिहेवियरल थेरपी घेऊ शकता. या थेरपीमध्ये आणि औषधांच्या माध्यमातून पॅनिक अँटॅकवर इलाज करता येऊ शकतो. औषधांबरोबर सायकोथेरपी मुळे लवकर आराम मिळू शकतो.
पॅनिक अँटॅक च्या रुग्णांनी मद्यपान किंवा कॉफीचे सेवन करता कामा नये. त्याचबरोबर संतुलित आहाराचे सेवन करावं. फळं, ग्रीन टी यांचं सेवन करणे फायद्याचे ठरले. सकारात्मक विचार करा, आवडत्या गोष्टी, मुलांबरोबर वेळ घालवा आणि व्यायाम करा.
लक्षात ठेवा
- पॅनिक डिसओऑर्ड एक प्रकारची एंग्जायटी डिसऑर्डर आहे.
- पॅनिक अटॅक सतत येण्याने रोजच्या व्यवहाराशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
- अटॅक परत येऊ नये याकरिता ज्या ठिकाणी किंवा ज्या स्थितीमुळे अटॅक आला आहे, ती स्थिती किंवा त्या ठिकाणी जाणं टाळा.