वाढलेलं कॉलेस्ट्रॉल म्हणजे हृदयरोगाचा धोका, तुमचे गुडघे आणि हात देतात याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 02:02 PM2021-09-28T14:02:17+5:302021-09-28T14:03:01+5:30

द अमेरिकन अकॅडेमी ऑफ डेर्मेटोलॉजी असोसिएशननुसार, काही प्रमाणात तुमची त्वचा तुमच्या शरीरात वाढलेल्या कॉलेस्टेरॉलचे संकेत देत असते.

Symptoms of high cholesterol | वाढलेलं कॉलेस्ट्रॉल म्हणजे हृदयरोगाचा धोका, तुमचे गुडघे आणि हात देतात याचे संकेत

वाढलेलं कॉलेस्ट्रॉल म्हणजे हृदयरोगाचा धोका, तुमचे गुडघे आणि हात देतात याचे संकेत

Next

रोजच्या कामाच्या व्यापामध्ये आपलं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. यावेळी योग्यवेळी चांगला आहार न घेतल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामध्ये ब्लड शुगर, बीपीचा त्रास तसंच हृदयाच्या समस्यांची तक्रार वाढते. मुख्य म्हणजे या सर्वांमध्ये कॉस्ट्रॉलचं प्रमाण फार महत्त्वाचं असून तो एक उपयुक्त घटक मानला जातो.

हार्ट अटॅक येण्यामागे महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कोलेस्टेरॉल. ज्यावेळी कॉलेस्टेरॉल तुमच्या रक्ताच्या माध्यमातून रक्त प्रवाहात येतं तेव्हा आजार उद्भवण्याची शक्यता असते.

वाढलेल्या कॉलेस्टेरॉलची लक्षणं

द अमेरिकन अकॅडेमी ऑफ डेर्मेटोलॉजी असोसिएशननुसार, काही प्रमाणात तुमची त्वचा तुमच्या शरीरात वाढलेल्या कॉलेस्टेरॉलचे संकेत देत असते.

हात, कोपर आणि पायांवर दिसतात लक्षणं
वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात. त्याचप्रमाणे कोपर, गुडघे, हात, पायांचे तळवे आणि इतकंच नाही तर नाकावरही आढळतात. काही वेळा पिंपल्स किंवा चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांसारखे वाटल्याने या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं. मात्र कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर या पुळ्यांचा आकार मोठा होतो. अनेकवेळा त्यांच्यामुळे कोणतीही वेदना जाणवत नाही.

शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात कशी ठेवावी?
कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील. यामध्ये-

  • हेल्दी फॅट असलेल्या अन्नाचा आहारात समावेश करावा
  • प्रक्रिया केलेले अन्न खाणं टाळा
  • आहारात साखरेचं प्रमाण कमी करा
  • दररोज वर्कआऊट करा
  • ग्रीन टी प्या
  • प्रोटीनचं सेवन वाढवा
     

Web Title: Symptoms of high cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.