पुन्हा पुन्हा लघवी लागते, फोर्स कमी झालाय? ही 8 लक्षण दिसताच डॉक्टरांना दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:19 AM2023-02-08T10:19:25+5:302023-02-08T10:20:01+5:30
अर्थातच कुणासाठीही हा आजार कुणासाठीही त्रासदायक ठरू शकतो. मात्र, या आजारावर उपचार आहेत. त्याआधी जाणून घेऊ हा आजार होण्याची कारणं आणि याला कशाप्रकारे रोखता येतं.
लघवीवर कंट्रोल करता न येणं हा एक सामान्य आजार आहे. ज्याला मेडिकल भाषेत स्ट्रेस यूरिनरी इनटोलरेंस (SUI) म्हणतात. हा आजार जगभरातील लाखो लोकांना होत असतो. जेव्हा लघवी येते तेव्हा बरेच लोक ती काही वेळासाठी रोखून धरतात. पण या आजाराने पीडित लोक खोकले, बसले किंवा व्यायाम करत असले तर त्यांची लघवी लीक होते.
अर्थातच कुणासाठीही हा आजार कुणासाठीही त्रासदायक ठरू शकतो. मात्र, या आजारावर उपचार आहेत. त्याआधी जाणून घेऊ हा आजार होण्याची कारणं आणि याला कशाप्रकारे रोखता येतं.
लघवी लीक होण्याची लक्षण
लघवी रोखून धरण्यास समस्या होणे
लगेच किंवा पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणे
एकदा लघवी केल्यावर पुन्हा लघवीला जावं लागणे
लघवी पास करण्यात समस्या जसे की, फोर्स कमी होणे
लघवी पास करण्यासाठी दबाव टाकावा लागणे
लघवी करताना अडखडत येणे
ब्लॅडर पूर्णपणे रिकामं न होणे
लघवी झाल्यावरही काही थेंब येत राहणे
लघवी लीक होण्याच्या आजाराचं कारण
FDA च्या एका रिपोर्टनुसार, एसयूआईचं मुख्य कारण पेल्विक फ्लोरमध्ये कमजोरी. पेल्विक फ्लोरच्या मसल्स मूत्राशयाला आधार आणि लघवी कंट्रोल करण्यास मदत करतात. काळानुसार या मांसपेशी कमजोर होता, ज्यामुळे हा आजार होतो. प्रेग्नेंन्सी, डिलीवरी, मेनोपॉज, वय वाढणं आणि लठ्ठपणा यामुळेही पेल्विक मसल्स कमजोर होतात. पुरूषांच्या तुलनेत महिलांना याचा धोका अधिक राहतो.
काय आहे यावर उपाय?
एसयूआईवर उपचाराचे अनेक पर्याय आहेत. यासाठी तुम्ही कीगल एक्सरसाइज करू शकता. याने पेल्विक मसल्स मजबूत होता आणि लघवीसंबंधी अनेक विकारांवर उपचार होतो. त्याशिवाय जीवनशैलीमध्ये बदल जसे की, वजन कमी करणे, स्मोकिंग सोडणे आणि मूत्राशयाच्या जळजळीपासून वाचणंही एसयूआयच्या लक्षणांना कमी करण्यास मदत करू शकतं. डॉक्टर यावर वेगवेगळ्या प्रकारे उपचार करतात.
या गोष्टींची घ्या काळजी
ही एक कॉमन समस्या आहे आणि लाखो लोक याने पीडित राहतात. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. यावर उपाय शक्य आहे. व्यायाम, जीवनशैलीमध्ये बदल, औषधे, सर्जरी आणि लेजर उपचारही करता येतात. जर तुम्हाला ही लक्षण दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना भेटा.