मोनोपॉज दरम्यान अनेक महिलांमध्ये उद्भवते हॉट फ्लॅशची समस्या; जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:56 PM2019-10-25T12:56:59+5:302019-10-25T12:59:22+5:30
मोनोपॉज दरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून येतात. ही स्थिती तेव्हा उद्भवते, ज्यावेळी महिला वयाच्या पन्नाशीच्या आसपास असतात.
मोनोपॉज दरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून येतात. ही स्थिती तेव्हा उद्भवते, ज्यावेळी महिला वयाच्या पन्नाशीच्या आसपास असतात. यादरम्यान त्यांच्या शरीरामध्ये वेगाने हार्मोन चेंजेस होतात. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. यांपैकी एक समस्या म्हणजे, हॉट फ्लॅशेज.
हॉट फ्लॅशेज एक अशी स्थिती आहे, ज्यावेळी व्यक्तीला अचानक चेहरा आणि छातीजवळ गरम होऊ लागतं. खूप घाम येतो आणि चेहऱ्यावर रेडनेस दिसू लागतो. यादरम्यान, घाबरणं किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होणं यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा अशाप्रकारचे हॉट फ्लॅशेज आल्यानंतर लगेचच शरीर थंड पडतं. यामागील कारण म्हणजे, अचानक ब्लड फ्लो कमी होणं हे असू शकतं.
मोजोपॉज दरम्यान, अनेक महिलांना अशाप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही मोनोपॉज दरम्यान असा समस्यांचा सामना करत आहात तर तुम्हाला लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. मोनोपॉजची स्थिती साधारणतः एक वर्ष ते दहा वर्षांपर्यंत राहते. यादरम्यान अनेकदा मासिक पाळीचा सामना करावा लागतो. कदाचित तुम्हाला हे ठाऊक नसेल की, मोनोपॉज दरम्यान महिलांना दात दुखणं, त्वचेला खाज येणं, त्वचा ड्राय होणं, अचानक घाबरणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही दावा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)