जर शरीराच्या या भागात येत असेल सूज, तर असू शकते अपेंडिक्सची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 04:16 PM2022-10-03T16:16:08+5:302022-10-03T16:18:10+5:30
Appendicitis Health Issue: या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. चला जाणून घेऊन अपेंडिक्सची लक्षण काय काय असतात.
Appendicitis Health Issue: अपेंडिक्स झाल्यावर पोटात अचानक कळ येते. अनेकदा लोक याला सामान्य पोटदुखी समजून याकडे दुर्लक्ष करतात. हे दुखणं दूर करण्यासाठी अनेकजण अॅंटीबायोटीक औषध घेतात. हे घेतल्यावर वेदना तर दूर होते. पण नंतर मोठी समस्या निर्माण होते. अपेंडिक्स झाल्यावर एबडोमनमध्ये वेदना होते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. चला जाणून घेऊन अपेंडिक्सची लक्षण काय काय असतात.
काय आहे अपेंडिक्स
अपेंडिक्स शरीराचा एक अवयव असतो. 4 इंच लांब अपेंडिक्स पोटाखाली डावीकडे असतो. तसं तर शरीरात याचं काहीच काम नसतं. पण जर हा ब्लॉक झाला तर मोठी समस्या होऊ शकते. यात सूज येते आणि यात पसही होतो. ज्यामुळे ऑपरेशन करून तो काढावा लागतो.
अपेंडिक्सचं दुखणं
अपेंडिक्स झाल्यावर पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात. अपेंडिक्सच्या वेदना नाभिच्या आजूबाजूला होतात आणि हळूहळू वाढतात. हे दुखणं इतकं वाढतं की, चालणंही अवघड होऊन बसतं.
अपेंडिक्सची लक्षणे
अपेंडिक्स झाल्यावर पोटात दुखण्यासोबतच इतरही काही संकेत मिळतात. जर अपेंडिक्समध्ये समस्या असेल तर पोट फुगू लागतं. उलटी, जुलाब अशा समस्याही होऊ लागतात. कधी कधी तापही येतो.
अपेंडिक्सचे प्रकार
एक्यूट अपेंडिसाइटिस
एक्यूट अपेंडिक्स ही ती स्थिती असते जेव्हा अपेंडिक्सचा सुरूवातीचा काळ असतो. हा अपेंडिक्स झाल्यावर पोटात दुखतं आणि उलटीची समस्या होऊ लागते. जर वेळीच यावर उपचार केले तर एक्यूट अपेंडिक्स बरा केला जाऊ शकतो.
क्रोनिक अपेंडिसायटिस
क्रोनिक अपेंडिक्स (Chronic Appendix) फारच खतरनाक स्थिती असते. क्रोनिक अपेंडिक्सची समस्या झाल्यावर एब्डोमनमध्ये सूज येते आणि अपेंडिक्समध्ये पस जमा होतो. क्रोनिक अपेंडिक्सच्या जास्तीत जास्त केसेसमध्ये सर्जरी करावी लागते.