शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात ब्रेन ट्यूमरचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 10:50 AM2022-10-06T10:50:48+5:302022-10-06T10:51:02+5:30

Symptoms Of Brain Tumor: वेळीच तुम्ही या लक्षणांना ओळखून त्यावर उपचार सुरू करावे. असं केलं नाही तर मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो. चला जाणून घेऊ काय असतात ब्रेन ट्यूमरची लक्षणे...

Symptoms of brain tumor : Brain tumor symptoms and reason, know how can detect brain tumor sign | शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात ब्रेन ट्यूमरचे संकेत

शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात ब्रेन ट्यूमरचे संकेत

googlenewsNext

Symptoms Of Brain Tumor: जर तुम्हाला नेहमीच चक्करयेत असेल, नेहमीच डोकेदुखी राहत असेल, कोणतंही काम करताना पाय थरथरत असतील तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षण ब्रेन ट्यूमर असण्याचे संकेत असू शकतात. डोक्यात जेव्हा ट्यूमर होतो तेव्हा सुरूवातीला याची काहीच लक्षण दिसत नाहीत. पण जसजसा तो मोठा होतो, याचे संकेत समोर येऊ लागतात. अशात गरजेचं असतं की, वेळीच तुम्ही या लक्षणांना ओळखून त्यावर उपचार सुरू करावे. असं केलं नाही तर मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो. चला जाणून घेऊ काय असतात ब्रेन ट्यूमरची लक्षणे...

ब्रेन ट्यूमरची लक्षणे (Symptoms Of Brain Tumor) 

- बोलताना समस्या होणे

- डोळ्यांची दृष्टी कमजोर होणे

- शरीराचं संतुलन ठेवण्यास अडचण

- सतत मळमळ किंवा उलटीसारखं होणे

- शरीरातील मांसपेशी आंकुचन पावणे

- डोकं सतत दुखत राहणे

- सतत थकवा जाणवणे

- हात-पायांमध्ये झिणझिण्या

- गोष्टी विसरणे

- बोलता बोलता बेशुद्ध होणे

ब्रेन ट्यूमरची कारणे

डॉक्टरांनुसार, ब्रेन ट्यूमर कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. ही मुळात डोक्यात तयार होणारी एक गाठ असते. जी हळूहळू वाढत जाते. ही गाठ अनेकदा डोक्यावर पडल्याने होते तर अनेकदा आनुवांशिक कारणांनी ही गाठ तयार होते. जे लोक रेडिएशनच्या जास्त संपर्कात येतात. त्यांनाही मेंदूत ट्यूमर होण्याचा धोका असतो. खासकरून आयोनीजिंग रेडिएशनच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना हा धोका जास्त असतो.

काय आहे उपचार

मेडिकल एक्सपर्ट सांगतात की, मेंदूमध्ये ट्यूमर तयार झाल्यावर तो वाढणं सुरू करतो. तो वाढण्याची स्पीड वेगवेगळ्या रूग्णात वेगवेगळी असू शकते. काही लोकांमध्ये हा काही आठवड्यांमध्येच पसरतो तर काहींना महिने लागतात. जेव्हा ट्यूमर वाढतो तेव्हा तो मेंदूतील शरीराला जोडणाऱ्या तंत्रिकांना नुकसान पोहोचवतो. या आजाराचा एकमेव उपाय म्हणजे सर्जरी आहे. जर वेळीच उपचार केले नाही तर जीवाला धोका होऊ शकतो.

Web Title: Symptoms of brain tumor : Brain tumor symptoms and reason, know how can detect brain tumor sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.