Symptoms of Diabetes: 'ही' समस्या आहे डायबिटीसचं गंभीर लक्षण, दुर्लक्ष कराल तर पडेल महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 03:36 PM2022-02-11T15:36:09+5:302022-02-11T15:36:34+5:30
Symptoms of Diabetes: डायबिटीस तेव्हा होतो जेव्हा शरीरात ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar) प्रमाणापेक्षा जास्त होते. ही स्थिती तेव्हा येते जेव्हा शरीरात इन्सुलिनची कमतरता होते किंवा शरीराच्या कोशिका हार्मोन्सप्रति प्रतिक्रिया देणं बंद करतात.
Symptoms of Diabetes: डायबिटीस (Diabetes) एक फारच कॉमन आजार होत चालला आहे. जर हा आजार एकदा कुणाला झाला तर आयुष्यभर पिच्छा सोडत नाही. डायबिटीस तेव्हा होतो जेव्हा शरीरात ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar) प्रमाणापेक्षा जास्त होते. ही स्थिती तेव्हा येते जेव्हा शरीरात इन्सुलिनची कमतरता होते किंवा शरीराच्या कोशिका हार्मोन्सप्रति प्रतिक्रिया देणं बंद करतात.
डायबिटीस कंट्रोल झाला नाही तर अनेक शारीरिक समस्या जसे की, हार्ट अटॅक, किडनी डिजीज, डोळ्यांची समस्या, एम्प्यूटेशन इत्यादीची शक्यता वाढते. अशात डायबिटीसला कंट्रोल करण्यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही तुमची ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवा.
हाय ब्लड शुगर लेव्हलचे अनेक संकेत आणि लक्षणं दिसतात. जसे की, जास्त तहान लागणे, धुसर दिसणे, अधिक लघवी लागणे, थकवा आणि अचानक वजन कमी होणे. शुगर लेव्हल अधिक झाल्याचा आणखी एक गंभीर संकेत आहे सतत कफ असलेला खोकला येणे. जर तुम्हालाही अनेक दिवसांपासून क्रोनिक कफची समस्या असेल, याकडे दुर्लक्ष करू नका.
बीएमसी पल्मोनरी मेडिसीन जर्नलमध्ये २०१७ मध्ये प्रकाशित एका तुलनात्मक रिसर्चनुसार, कफसोबत येणारा क्रोनिक खोकला हा हाय ब्लड शुगर लेव्हलचा गंभीर संकेत असू शकतो. या रिसर्चमध्ये लॉजिस्टिक रिग्रेशन मॉडलच्या माध्यमातून रेस्पिरेटरी लक्षणांवर टाइप २ डायबिटीसच्या प्रभावाची टेस्ट केली. रिसर्चमध्ये परिणामांनुसार, टाइप २ डायबिटीस आणि खोकला यात संबंध आढळून आला.
यानुसार, टाइप २ डायबिटीस असलेल्या व्यक्तींमध्ये सेल्फ रिपोर्टेड डिस्पेनिया आढळून आला. डिस्पेनिया एक खोकल्यासंबंधी समस्या आहे. ज्यात दम लागणे, मोठा श्वास घेण्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. यामुळे छातीत दाटल्यासारखं वाटतं. रिसर्चचे तज्ज्ञ या निष्कर्षावर पोहोचले की, टाइप २ डायबिटीसने ग्रस्त लोक समान वयाच्या लोकांच्या तुलनेत ग्रेड २ डिस्पेनिया आणि क्रोनिक कफने अधिक प्रभावित होतात.