सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच दिसतात डायबिटीसही लक्षण, दुर्लक्ष करणं पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:30 AM2023-07-10T09:30:45+5:302023-07-10T09:31:05+5:30
Symptoms of diabetes in Morning : डायबिटीस कोणत्याही वयात होऊ शकतो. टाइप 2 डायबिटीस 40 वयानंतर अधिक होतो. हा आजार किडनी आणि हृदयरोगाचं एक मोठं कारण आहे.
Symptoms of diabetes in Morning : भारतात गेल्या काही वर्षात डायबिटीसच्या रूग्णांची संख्या खूप जास्त वाढली आहे. डायबिटीसचा आजार एकप्रकारची एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. ज्यात शरीरात पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही किंवा त्याच्या योग्यपणे वापर होण्यास अडचण येते. अशात शरीरात इन्सुलिनची कमतरता झाली की, शुगरचं प्रमाण वाढू लागतं. ज्यामुळे किडनी, हृदय, डोळे आणि एकूणच आरोग्य प्रभावित होतं.
डायबिटीस कोणत्याही वयात होऊ शकतो. टाइप 2 डायबिटीस 40 वयानंतर अधिक होतो. हा आजार किडनी आणि हृदयरोगाचं एक मोठं कारण आहे.
मुळात आपलं लिव्हर आपलं शरीर दिवसासाठी तयार करण्यासाठी आणि त्याला अधिक सक्रीय करण्यासाठी ब्लड शुगर रिलीज करतं. हेच कारण आहे की, डायबिटीसने पीडित लोकांना सकाळी हाय ब्लड शुगर जाणवतं. ज्यात घशात आणि तोंडात कोरडेपणा, रात्री पुन्हा पुन्हा लघवी करूनही लघवीची पिशवी भरलेली राहणं, दृष्टी कमजोर होणे आणि भूक यासारखी लक्षण दिसतात.
नेक लोकांना डायबिटीसची माहिती मिळण्याआधीच थकवा, झोप येणे, दृष्टी कमजोर होणे, फंगल इन्फेक्शन आणि फोडं अशी लक्षण दिसू शकतात. अशात व्यक्तीला शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आणि आजार वाढण्याआधीच त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.
सकाळी दिसणारी लक्षण
डॉक्टर सांगतात की, असं नाहीये की, सकाळी दिसणारी लक्षण दिवसा दिसणार नाहीत. खाज, थकवा, कमजोरी, ज्यात भूक लागणं, जास्त तहान लागणं ही लक्षण रात्री दिवस दोन्हीवेळ दिसू शकतात. वजन कमी होणे, जखमा लवकर बऱ्या न होणं, प्रायव्हेट पार्टमध्ये खाज अशी लक्षणं तुम्हाला दिवसभर दिसू शकतात.
डायबिटीसची इतर लक्षण
जास्त भूक लागे, अचानक वजन कमी होणे, हात आणि पायात झिणझिण्या, थकवा, कमजोरी, त्वचा कोरडी, जखमा लवकर न भरणे, जास्त तहान लागणे, खासकरून रात्री जास्त लघवी लागणे, इन्फेक्शन, केसगळती ही टाइप 2 डायबिटीसची लक्षण आहेत. तेच टाइप 1 डायबिटीसमध्ये मळमळ, पोटदुखी, उलटीसारखी लक्षण दिसतात.