हे 5 संकेत देतात शरीरात आयर्नची कमतरता असल्याचा इशारा, वेळीच व्हा सावध नाही तर पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 05:24 PM2022-07-15T17:24:34+5:302022-07-15T17:25:31+5:30

How To Detect Iron Deficiency: जर तुमच्या शरीरात ऑक्सिजन घेऊन जाणारं हीमोग्लोबिन योग्य प्रमाणात नसेल तर तुमचे मसल्स आणि टिश्यू योग्यप्रकारे काम करणार नाही. या स्थितीला एनीमिया म्हणून ओळखलं जातं.

Symptoms of iron deficiency : These 5 signs indicate lack of iron in the body notice anemia otherwise there will be serious problem | हे 5 संकेत देतात शरीरात आयर्नची कमतरता असल्याचा इशारा, वेळीच व्हा सावध नाही तर पडेल महागात

हे 5 संकेत देतात शरीरात आयर्नची कमतरता असल्याचा इशारा, वेळीच व्हा सावध नाही तर पडेल महागात

googlenewsNext

How To Detect Iron Deficiency: जेव्हा तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात आयर्न नसतं तेव्हा शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. तुमच्या शरीराला हीमोग्लोबिन बनवण्यासाठी आयर्नची गरज असते. एक प्रोटीन जे रेड ब्लड सेल्सना ब्लड वेसल्सच्या माध्यमातून ऑक्सिजन ट्रान्समिट करण्यासाठी मदत करतं. जर तुमच्या शरीरात ऑक्सिजन घेऊन जाणारं हीमोग्लोबिन योग्य प्रमाणात नसेल तर तुमचे मसल्स आणि टिश्यू योग्यप्रकारे काम करणार नाही. या स्थितीला एनीमिया म्हणून ओळखलं जातं. आय़र्नच्या कमतरतेमुळे होणारा एनीमिया जगभरात अनेकांना होतो. आयर्नच्या कमतरतेची अनेक लक्षणे (symptoms Of Iron Deficiency) असू शकतात. 

1) श्वास घेण्यास त्रास

हीमोग्लोबिन तुमच्या लाल रक्त पेशींना तुमच्या शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी सक्षम बनवतं. हीमोग्लोबिन लेव्हल कमी झाल्यावर आयर्नच्या कमतरतेसोबत ऑक्सिजन लेव्हलही कमी होते. चालण्यासारख्या सामान्य क्रिया करण्यासाठी तुमच्या मांसपेशींना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. जेव्हा तुमचं शरीर जास्त ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करतं. तेव्हा तुम्हाला दम लागतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे हे एक सामान्य लक्षण आहे.

2) डोकेदुखी

डोकेदुखी शरीरात आयर्नची कमतरता झाल्यावर होऊ शकते. खास अशा महिलांना जास्त त्रास होतो ज्यांची मासिक पाळी सुरू आहे. पण आयर्नची कमतरता आणि डोकेदुखी यातील कारण अजून समजू शकलेलं नाही.

3) त्वचा आणि केस ड्राय व ड्रॅमेज होणं

त्वचा किंवा केस डॅमेज झाले असतील तर हे आयर्नची कमतरता असल्याचं लक्षण आहे. आयर्नची कमतरता असेल तर हीमोग्लोबिन लेव्हल कमी होते. ज्यामुळे केस तयार करणाऱ्या कोशिकांपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचू शकत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा आणि केस कमजोर व ड्राय होतात. आयर्नची कमतरता असेल तर केसगळतीही होते.

4) रेस्टलेस लेग

रेस्टलेस लेग सिंड्रोमला आयर्नच्या कमतरतेसोबत जोडून पाहिलं जातं. जेव्हा तुमचे पाय आरामाच्या स्थितीत असतात ते हलवण्याची तुम्हाला तीव्र इच्छा होते. त्यासोबतच तुमच्या पायांवर खाज येत असेल. रात्री खाज जास्त असेल तर तुम्हाला झोपही लागणार नाही.

5) नखांचा आकार-रंग बदलणे

नखांचा आकार चमच्यासारखा गोल झाला असेल तर हा आयर्नची कमतरता असल्याचा संकेत आहे. या स्थितीला कोयलोनीचिया नावानेही ओळखलं जातं. या स्थितीत चमच्याच्या आकाराची नखे, ज्याचं केंद्र खाली असतं आणि कॉर्नर चमच्यासारखे गोल दिसू लागतात.

Web Title: Symptoms of iron deficiency : These 5 signs indicate lack of iron in the body notice anemia otherwise there will be serious problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.