पोट दुखण्याशिवाय जर 'ही' लक्षणं दिसली तर असू शकतो किडनी स्टोन! वेळीच डॉक्टरकडे जा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 05:20 PM2022-07-24T17:20:08+5:302022-07-24T17:25:16+5:30

काही कारणांमुळे किडनीचं कार्य बिघडून गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. किडनीच्या विविध विकारांपैकी किडनी स्टोन (Kidney Stone) अर्थात मूतखडा हा एक सर्वसामान्य विकार आहे.

symptoms of kidney stone | पोट दुखण्याशिवाय जर 'ही' लक्षणं दिसली तर असू शकतो किडनी स्टोन! वेळीच डॉक्टरकडे जा

पोट दुखण्याशिवाय जर 'ही' लक्षणं दिसली तर असू शकतो किडनी स्टोन! वेळीच डॉक्टरकडे जा

googlenewsNext

गेल्या काही वर्षांत नागरिकांच्या जीवनशैलीत (Lifestyle) मोठा बदल झाला आहे. ताण-तणाव वाढले आहेत. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. हृदयविकार, डायबेटीस, किडनी विकार वाढत आहेत. किडनी (Kidney) हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे. परंतु, काही कारणांमुळे किडनीचं कार्य बिघडून गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. किडनीच्या विविध विकारांपैकी किडनी स्टोन (Kidney Stone) अर्थात मूतखडा हा एक सर्वसामान्य विकार आहे.

हा विकार अत्यंत त्रासदायक समजला जातो. किडनी स्टोन होण्यापूर्वी त्याची काही लक्षणं शरीरात दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा विकार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे लक्षणं दिसताच तातडीने उपचार घेणं गरजेचं आहे. `इंडिया टिव्ही`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रक्त शुद्ध (Blood Filtration) करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी किडनीकडे असते. किडनी रक्त शुद्ध करताना सोडियम, कॅल्शियम आणि इतर खनिजं सूक्ष्म कणांच्या रूपात मूत्रमार्गामधून (Urinary Tract) मूत्राशयापर्यंत (Bladder) पोहोचवते. त्यानंतर ते युरिनवाटे बाहेर टाकले जातात. कोणत्याही कारणामुळे या कार्यात अडथळे आले तर संबंधित व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. किडनी स्टोन हा त्यापैकीच एक होय.

किडनी स्टोन होण्यापू्र्वी त्याची काही लक्षणं शरीरात दिसू लागतात. लवकर थकवा येणं हे किडनी विकाराचं एक लक्षण आहे. तुमच्या हातापायांना सूज येत असेल, तर ते किडनी स्टोनचं लक्षण असू शकतं. युरिनमधून रक्त पडणं हे किडनी स्टोनचं प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे हे लक्षण दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

वारंवार उलट्या होणं, तीव्र तापामुळे थरथर कापल्यासारखं वाटणं हीदेखील किडनी स्टोनची लक्षणं आहेत. खडे मूत्रमार्गात अडकले तर वारंवार युरिनला जावं लागणं, कमी युरिन होणं असा त्रास जाणवतो.अचानक पोटाततीव्र वेदना होणं (Abdominal pain) , तसंच बरगडीच्या खालच्या भागात वेदना होणं, युरिन करतेवेळी त्रास होणं ही किडनी स्टोनची प्रमुख लक्षणं आहेत. तसंच किडनी स्टोन झालेल्या व्यक्तीला युरिन करतेवेळी वेदना (Pain) आणि जळजळ होते. त्यामुळे अशा स्वरूपाचा कोणताही त्रास जाणवू लागल्यास तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे.

किडनी स्टोन म्हणजे काय?
किडनी स्टोन हा मीठ आणि खनिजांपासून बनलेला कठीण खडा असतो. सुरुवातीला तो अत्यंत लहान असतो; मात्र यामुळे हळूहळू गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. किडनी स्टोनची समस्या असल्यास त्याचा परिणाम शरीरात मूत्रमार्गापासून ते मूत्राशयापर्यंत जाणवतो. एखाद्या व्यक्तीच्या किडनीतून स्टोन बाहेर येऊन मूत्रमार्गात अडकला तर त्याला खूप तीव्र वेदना होतात. अशी स्थिती प्रसंगी धोकादायक ठरू शकते.

Web Title: symptoms of kidney stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.