शरीरात पाणी कमी झाल्यावर दिसतात ही गंभीर लक्षणं, दुर्लक्ष कराल तर येऊ शकतो हार्ट अटॅक...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:44 AM2024-08-19T10:44:43+5:302024-08-19T10:45:15+5:30
Side Effects of less water drinking : कमी पाणी प्यायल्याने शरीरावर अनेक नकारात्मक प्रभाव पडतात, ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांचा धोका वाढतो.
Side Effects of less water drinking : पाणी आपल्या शरीरासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती महत्वाचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉक्टरही नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण तरीही काही लोक काही कारणांनी दिवसभर भरपूर पाणी पिऊ शकत नाहीत. अशात त्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. कमी पाणी प्यायल्याने शरीरावर अनेक नकारात्मक प्रभाव पडतात, ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांचा धोका वाढतो.
पाणी कमी पिण्याचा थेट प्रभाव हृदयाच्या आरोग्यावर पडतो. कारण डिहायड्रेशनमुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या कार्यावर वाईट प्रभाव पडतो. ज्यात हार्ट अटॅक आणि कार्डियोवस्कुलर सिस्टमचा समावेश आहे. अशात आज या लेखात आम्ही तुम्हाला पाणी कमी प्यायल्याने हृदयावर काय परिणाम होतो ते सांगणार आहोत.
अनियमित हार्ट बीट
शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. जेव्हा शरीरात पाणी कमी होतं तेव्हा इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतात, ज्याचा प्रभाव हृदयाच्या ठोक्यांवर पडतो.
ब्लड फ्लो कमी होतो
पाणी कमी प्यायल्याने रक्त घट्ट होऊ शकतं. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयावर जास्त दबाव पडतो. या स्थितीमुळे हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या इतर समस्यांचा धोका वाढतो.
शरीराचं तापमान असंतुलित होतं
पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. पाणी कमी झालं तर शरीराचं तापमान असंतुलित होतं, ज्यामुळे हृदयावर जास्त दबाव पडतो.
किडनी आणि हृदयाचा संबंध
तुम्ही पाणी कमी प्याल तर याचा प्रभाव किडनीवरही पडतो आणि किडनीमध्ये काही समस्या झाली तर याचा नकारात्मक प्रभाव हृदयावर पडतो. कारण दोन्ही अवयवांचं एकमेकांसोबत संबंध असतो.
मेटाबॉलिज्मवर प्रभाव
पाणी कमी प्यायल्यामुळे मेटाबॉल्जिम स्लो होतं. ज्यामुळे शरीरात फॅट आणि टॉक्सिन्स वाढण्याचा धोका असतो. अशात हृदयाच्या धमण्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोकाही अधिक वाढतो.
एका दिवसात किती पाणी प्यावं?
सामान्यपणे रोज किती पाणी प्यावं हे वय, वजन, वातावरण आणि कामावर अवलंबून असतं. एक्सपर्टनुसार, निरोगी शरीरासाठी दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. इतकं पाणी प्यायल्याने किडनीसंबंधी आजारांचा धोका कमी होतो आणि पचनक्रियाही चांगली होते.
रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे
जर तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पित असाल तर ही सवय तुम्हाला निरोगी ठेवण्यास खूप फायदेशीर आहे. असं केल्याने पोट सकाळी साफ होतं आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. जेवण केल्यावर पाणी जास्त पिऊ नये, तसेच जेवण करतानाही पाणी पिणं टाळलं पाहिजे. याने अन्न चांगलं पचन होतं.