शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यास दिसतात 'ही' लक्षणं, जाणून घ्या कसे काढाल बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 03:52 PM2024-09-04T15:52:06+5:302024-09-04T16:30:25+5:30

How To Detox Body : बऱ्याच जणांना शरीरातील हे विषारी पदार्थ बाहेर काढावे माहीत नसतं. तेच आज आम्ही सांगणार आहोत. 

Symptoms that shows there is toxin in your body, know the home remedies | शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यास दिसतात 'ही' लक्षणं, जाणून घ्या कसे काढाल बाहेर!

शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यास दिसतात 'ही' लक्षणं, जाणून घ्या कसे काढाल बाहेर!

How To Detox Body : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल, प्रदूषण यामुळे शरीरात अनेक विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. हे विषारी पदार्थ शरीरात जमा झाले की, आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या वेळोवेळी होत राहतात. पण अनेकजण याकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. बऱ्याच जणांना शरीरातील हे विषारी पदार्थ बाहेर काढावे माहीत नसतं. तेच आज आम्ही सांगणार आहोत. 

ज्याप्रकारे आपण शरीर वरून स्वच्छ करतो, तशीच शरीराची आतूनही सफाई महत्वाची असते. त्याला बॉडी डिटॉक्स असं म्हणतात. जर हे केलं नाही तर शरीरात सतत काहीना काही समस्या होत राहतात. तसं तर शरीर स्वत:च सफाईसाठी सक्षम असतं. पण शरीरात जर विषारी पदार्थ वाढले तर तेव्हा काही उपाय करावे लागतात. अशात चार ड्रिंक्स तुमची मदत करू शकतात. 

शरीरात विषारी पदार्थ वाढल्याची लक्षणं

थकवा आणि कमजोरी

तर तुम्हाला छोटे छोटे काम करताना नेहमीच भरपूर थकवा जाणवत असेल आणि भरपूर घाम येत असेल तर हा तुमच्या शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्याचा संकेत असू शकतो. 

त्वचेसंबंधी समस्या

त्वचेवर पुरळ, पिंपल्स किंवा त्वचेसंबंधी इतर काही समस्या होणंही शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्याचा संकेत असू शकतो. विषारी पदार्थ जास्त झाल्यावर शरीर ते त्वचेच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. 

पचनासंबंधी समस्या

पोटात सूज, बद्धकोष्ठता किंवा अपचन यासारख्या समस्या देखील शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्याकडे इशारा करतात.

मूड स्विंग्स आणि मानसिक थकवा

जर तुम्ही लवकर चिडत असाल किंवा तणाव जास्त जाणवत असेल तर हाही शरीरात विषारी पदार्थ वाढल्याचा संकेत असू शकतो. 

झोपेची समस्या

झोप न येणं ही काही केवळ तणावासंबंधी समस्या नाही. अनेकदा शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळेही झोप न येण्याची समस्या होते.

बॉडी डिटॉक्ससाठी खास ड्रिंक्स

लिंबू पाणी

लिंबू पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते. तसेच यातील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया मजबूत होते. 

आलं आणि मधाचा चहा

आल्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात जे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. तर मध याला आणखी प्रभावी बनवतं. सोबतच याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्याही दूर होतात. या चहामध्ये चहा पावडर आणि दूध टाकायचं नसतं.

पदीना आणि लिंबाचा ज्यूस

पदीन्याने पचनक्रिया सुधारते आणि लिंबासोबत मिळून याचं सेवन केलं तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते. हा ज्यूस तुमच्या त्वचेवरही तजेलदारपणा आणतो.

सेलेरी ज्यूस

सेलेरी ज्यूसमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असतं. जे शरीराची सफाई प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने करतं. तसेच याने शरीर हायड्रेट राहण्यासही मदत मिळते.

Web Title: Symptoms that shows there is toxin in your body, know the home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.