हे संकेत सांगतात तुम्ही खाताय प्रमाणापेक्षा जास्त मीठ, जीव वाचवायचा असेल तर करा हे काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:42 AM2023-06-20T11:42:54+5:302023-06-20T11:43:30+5:30
Salt Side effect : जेव्हाही आपल्या शरीरात एखादी गोष्ट कमी झाली किंवा जास्त झाली तर शरीर काही संकेत देऊ लागतं. तसंच शरीरात मिठाचं प्रमाण जास्त झालं की, शरीर अनेक संकेत देतं.
Salt Side effect : मिठाशिवाय अनेक पदार्थाना काहीच चव येत नाही. पण डॉक्टर आणि वेगवेगळे रिसर्च सतत हेच सांगत असतात की, मिठाचं जास्त सेवन आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं. जास्त मीठ खाल्लं तर वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. जेव्हाही आपल्या शरीरात एखादी गोष्ट कमी झाली किंवा जास्त झाली तर शरीर काही संकेत देऊ लागतं. तसंच शरीरात मिठाचं प्रमाण जास्त झालं की, शरीर अनेक संकेत देतं.
ब्लोटिंग - मिठाचं जास्त सेवन कराल तर तुम्हाला ब्लोटिंगच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकदा जेवण केल्यावर तुम्हाला तुमचं पोट सामान्यापेक्षा जास्त फुगलेलं दिसतं. किडनीमध्ये काही प्रमाणात सोडिअम आढळतं. अशात तुम्ही आपल्या शरीरात आणखी सोडिअम टाकता तेव्हा किडनीला आपलं काम करण्यासाठी जास्त पाणी रोखून धरावं लागतं. शरीरात मिठाचं प्रमाण जास्त झाल्यावर पाणीही प्रमाणापेक्षा जास्त जमा होतं. या स्थितीला वॉटर रिटेंशन किंवा फ्लूइड रिटेंशन म्हणतात.
घसा कोरडा पडणं - बाहेर अनेक पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. लोक बाहेरचं अधिक खातात. जास्त मीठ असलेल्या पदार्थांच सेवन केल्याने तोंड कोरडं पडू लागतं आणि त्यामुळेच तुम्हाला सतत तहान लागते.
हाय ब्लड प्रेशर - शरीरात सोडिअमचं प्रमाण जास्त झाल्यावर हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागतो. ब्लड प्रेशरमध्ये हा बदल किडनीच्या माध्यमातून होतो. फार जास्त मिठाचं सेवन केल्याने किडनीसाठी फ्लूइड्सला बाहेर काढणं फार अवघड होतं, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढू लागतं.
झोपेत अडथळा - जर तुम्ही झोपण्याआधी जास्त सोडिअम असलेल्या पदार्थांचं सेवन कराल तर तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. रात्री झोपण्याआधी जास्त मीठ असलेले पदार्थ खाल्ल्याने झोप न येणं, अस्वस्थता जाणवणं आणि रात्री झोपमोड होणं अशा समस्या होतात.
हृदयरोग - मिठाचं जास्त सेवन केल्याने हृदयरोगांचा धोका जास्त वाढतो असा अनेक रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे. जर तुम्हाला हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मिठाचं सेवन कमी करा.
मळमळ होणे - रोजच्या आहारात जर मिठाचं सेवन जास्त केलं तर पोटाची समस्या वाढते. ज्यामुळे तुम्हाला मळमळ होण्याची समस्या होते. अशात मिठाचं सेवन कमी करा किंवा मीठ जास्त असलेल्या पदार्थांच सेवन कमी करा.