कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकला त्रासदायक, वेळीच उपचार घ्या; नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:26 AM2024-01-10T10:26:08+5:302024-01-10T10:28:10+5:30
हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला अशा आजारांनी अनेकजण त्रस्त असतात
Health Tips : हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला अशा आजारांनी अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात पडणारे धुके, प्रदूषण, थंडीचे वातावरण यांमुळे आजार आणखी बळावतात, पण या कारणांसह आणखी काही कारणांमुळेही हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास होतो. वेळीच काळजी घेतली नाही तर कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकला अधिक तापदायक ठरू शकतो.
कधी कधी सलग शिंका सुरू होतात, सुरुवातीला आपणही नाकात काहीतरी गेले असेल, धुळीचा त्रास झाला असेल असे समजून याकडे दुर्लक्ष करतो. आता थंडीच्या दिवसात तर वरच्या वर आपल्याला सर्दी, खोकला जाणवू शकतो. पण जर खूप दिवस होऊनही तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल तर, मात्र सावध होण्याची गरज आहे. एक-दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ टिकणारी सर्दी ही साइनोसाइटसचे लक्षण असू शकते. सर्दीसह तुम्हाला ताप, खोकला व सतत थकवा जाणवत असेल तर, वेळीच लक्षणे तपासून घ्या. थंडीत हा त्रास बळावू शकतो आणि जर योग्य उपचार केला नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काय काळजी घ्याल?
सकस आहार, नियमित व्यायाम, व्यसनापासून दूर राहा. अनेकजण आजार, दुखणे अंगावर काढतात. त्यातून आजार वाढू शकतो. सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार जिल्हा रुग्णालयात घेता येतात. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे,
असे तज्ज्ञांनी सांगितले.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका :
जर तुम्ही सर्दी आणि खोकल्याला हलक्यात घेत असाल तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष
करू नका.
कारण सर्दी, खोकला, घसादुखी, ताप, श्वास घेण्यास त्रास, मळमळ, डोकेदुखी ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत.
अशी लक्षणे दिसताच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून तुमची चाचणी करून घ्या.
गूळ आणि आले :
जर तुमचा सर्दी आणि खोकला औषध घेऊनही बरा होत नसेल. तर तुम्ही नियमितपणे आले आणि गूळ मिसळून सेवन करू शकता. हे कप काढून टाकण्यास मदत करेल. गूळ गरम करून वितळवून त्यात आल्याची पेस्ट मिक्स करून कोमट झाल्यावर खावी.
मध आणि आले :
मध आणि आले यांचे मिश्रण सर्दी, खोकला आणि घसादुखीवर जोरदार हल्ला करते. यासाठी एक आले बारीक करून त्यात मध मिसळा. दिवसातून ३ ते ४ वेळा याचे सेवन केल्यास खोकल्यापासून आराम मिळेल.