​हिवाळ्यात ट्रिपला जाताना घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2016 03:53 PM2016-12-21T15:53:42+5:302016-12-21T15:58:57+5:30

हिवाळ्यात बरेचजण थंडीपासून बचावासाठी घरातच बसलेले असतात. मात्र, काहीजण जर ट्रिपला जाण्याचे नियोजन करीत असतील तर त्यात वाईट काही नाही.

Take care to go trips in winter! | ​हिवाळ्यात ट्रिपला जाताना घ्या काळजी!

​हिवाळ्यात ट्रिपला जाताना घ्या काळजी!

Next

/>हिवाळ्यात बरेचजण थंडीपासून बचावासाठी घरातच बसलेले असतात. मात्र, काहीजण जर ट्रिपला जाण्याचे नियोजन करीत असतील तर त्यात वाईट काही नाही. जर आपण विशेषत: अ‍ॅडव्हेन्चर ट्रिपचे नियोजन करीत असाल, तर ट्रिपला जाण्यापूर्वी काळजी घेणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. परिवार सोबतच असेल तर सावधानी अत्यावश्यक आहे. त्याशिवाय आपण ट्रिप एन्जॉय करुच शकत नाही.
 

अशी घ्या काळजी-
* थंडीचा जास्त परिणाम कानांवर होतो. त्यामुळे कान अगोदर झाकले पाहिजे.
* आपल्या मानेच्या अवतीभोवतीदेखील गरम शॉल किंवा स्कार्फ बांधा.
* बाहेर फिरायला जाण्याअगोदर आपल्या हातावर ग्लोव्हज् परिधान करा.
* पायात नेहमी बूट ठेवा. घराच्या बाहेर दुसऱ्या जागेवर साइट सीनसाठी बूट अपाल्यासाठी खूपच चांगले राहतील, कारण बुटांमुळे आपले पाय गरम राहण्यास मदत होईल. 
* गरम स्वेटर, थर्मो वेअर आणि ओव्हर कोट आपल्या बॅगेत अवश्य ठेवा आणि त्यांचा वापरही करावा. 
* मुलांसाठी जास्त कपडे नकोत मात्र गरम कपड्यांची कमी नको. 
* एक चांगला सन ग्लास, सनस्क्रीन लोशनदेखील सोबत अवश्य ठेवा.   
 

Web Title: Take care to go trips in winter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.