पावसाळ्यात पाय सांभाळा, नाहीतर...

By admin | Published: May 30, 2017 05:33 PM2017-05-30T17:33:57+5:302017-05-30T17:41:10+5:30

पावसाळ्यात पायांची काळजी घेतली नाही तर पायांचं दुखणं मागे लागू शकतं!

Take care of the rain during the rainy season, otherwise ... | पावसाळ्यात पाय सांभाळा, नाहीतर...

पावसाळ्यात पाय सांभाळा, नाहीतर...

Next

- नितांत महाजन

‘आपके पांव देखे, बहौत हसीं है, इन्हे जमीं पर मत उतारना, मैले हो जाएंगे’ असं आपल्याला कुणी म्हणो ना म्हणो निदान असं तरी म्हणू नये की, आपके पांव देखे बहौत गंधे है, इन्हे कभी पानी तो लगाए..! असं होतं अनेकदा कारण आपण आपल्या पायांकडे फारसं लक्ष देत नाही, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही. आता पावसाळा जवळ येवून ठेपलेला असताना याची काळजी घ्यायला हवी की दरवर्षी आपण पावसाळ्यात ज्या चूका करतो निदान त्या तरी यंदा करू नयेत. कारण प्रत्येक पावसाळयात आपण त्याच चूका करत राहिलो तर पायांच्या व्याधी आपल्यामागे लागू शकतात. अनेकांची पायदुखी पावसाळ्यात डोकं वर काढते. पायाला इन्फेक्शन, बोटांत जखमा, टाचदुखी, पायांवर रॅश असे अनेक आजार या काळात होतात. याची कारणं जितकं बाह्य असतात तितकीच किंवा त्याहून अधिक आपला हलगर्जीपणा कारणीभूत असतो. यंदा चपला घेण्यापासूनच आपल्या चूका सुधारायला सुरुवात करू. म्हणजे पावसाळी पायदुखी टाळता येवू शकेल.त्यासाठी या काही गोष्टी करता येतील.

 

* पावसाळी रबरी चपला घेवू नका. तुम्ही दिवसभरात खूप चालत असाल तर त्यानं पायदुखी, टाचदुखी सुरु होवू शकते.

* चांगल्या दर्जाच्या वॉटरप्रूफ चपला विकत घ्या. तुम्ही जास्त फिरतीचं, चालण्याचं काम करत असाल तर चांगल्या चपला आणि बूट ही तुमची गरज आहे. किंवा खरंतर गुंतवणूकच आहे.

*  प्लॅट, सपाट चपला अजिबात घेवू नका. बायका ज्या रबरी सपाट चपला वापरतात त्या तर अजिबात वापरू नयेत.
* आपण जी चप्पल घेवू तिला किमान एक ते दीड सेण्टीमिटरचं हील हवं. त्यानं टाचेला सपोर्ट मिळतो आणि शरीराचा तोल चांगला सांभाळला जातो.
* पावसाळ्यात हील्स मात्र वापरू नका.

* अत्यंत तकलादू बेल्टची सॅण्डल कधीही वापरू नका. त्या तकलादू पट्टीवर आपल्या शरीराचा तोल अवलंबून असतो, त्यानं पाय घसरू शकतो. जाड बेल्ट किंवा अनेक बेल्ट असलेली चप्पल घ्या.

*  बाहेरुन आल्यावर आपण पाय धुतोच पण पावसाळ्यात गरम पाण्यात मीठ किंवा हॅण्डवॉश टाकून जरा वेळ पाय बुडवून ठेवावेत.

*  रोज रात्री झोपताना पायांना, पाऊलांना, तळपायाला मॉइश्चरायझर आवश्य लावावं.

*  टाचेकडे लक्ष द्या, टाच अती टणक होत असेल, किंवा भेगा पडत असतील तर डॉक्टरला दाखवा.

*  खूप वेळ पाण्यात चालला असाल तर लगेच पाय धुवू नका. पाय कोरडे करा, शक्य तर शेका. त्वचा नॉर्मल झाली की पाण्यात पाय घाला, नाहीतर बॉडी टेम्परेचरवर त्याचा परिणाम होतो.

* पावसाळ्यात पोटऱ्या, बोटं दुखत असतील, वाकडे होत असतील तर त्वरित डॉक्टरला दाखवा. अन्यथा वाताचा विकार वाढू शकतो.

(पावसाळी रबरी चपला घेताय? सावधान...)

Web Title: Take care of the rain during the rainy season, otherwise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.