पावसाळ्यात जपा स्वत:ला, जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स, पावसाळा जाईल आरोग्यपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 12:28 PM2021-07-21T12:28:15+5:302021-07-21T12:28:49+5:30

पावसाळ्यात आपल्याला अन्न, पाणी आणि डासांमुळे अनेक आजार होउ शकतात. यामध्ये तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, टायफॉयड, लेप्टोस्पायरोस,कावीळ, डेंग्युआणि मलेरिया इत्यादी यांचाही समावेश आहे.

Take care of yourself in the rainy season, learn expert tips, the rainy season will be healthy | पावसाळ्यात जपा स्वत:ला, जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स, पावसाळा जाईल आरोग्यपूर्ण

पावसाळ्यात जपा स्वत:ला, जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स, पावसाळा जाईल आरोग्यपूर्ण

googlenewsNext

पावसाळ्यात आपल्याला अन्न, पाणी आणि डासांमुळे अनेक आजार होउ शकतात. यामध्ये तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, टायफॉयड, लेप्टोस्पायरोस,कावीळ, डेंग्यू आणि मलेरिया इत्यादी यांचाही समावेश आहे.

असं का आहे?

  • मान्सूनमध्ये विशेषतः भारतात इतर मोसमांपेक्षा व्हायरस, बॅक्टेरिया आणि इतर संसर्ग होण्याचा धोका दोन पट जास्त असतो.
  • हवेतील उच्च आर्द्रता आणि तापमान हानिकारक सूक्ष्मजीव वाढण्यास सक्षम करते, परिणामी बऱ्याच रोगांचे संक्रमण होते.
  • या हंगामात, मलनिः सारण पाईप्स मधील अडथळा आणि ओव्हरफ्लो, पिण्याचे पाणीपुरवठा दूषित करण्याचे प्रमुख स्त्रोत आहे.
  • मान्सून हा डासांचा प्रजनन काळ आणि डासांद्वारे होणा-या आजारांसाठी शिखर काळ असतो.
  • तथापि, या महिन्यांमध्ये निरोगी राहणे, अगदी योग्य वेळी योग्य खबरदारीच्या उपाययोजना करण्यासारखेच सोपे आहे.

 ते टाळण्यासाठी येथे काही टिप्स आहेतः

  • नेहमी पाणी उकळून घ्यावे आणि फळ किंवा भाज्या वापर्ण्यापूर्वी धुवाव्यात
  • आपले अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवा आणि बाहेरच्या अन्नाचा वापर टाळा
  • वैयक्तिक आणि पर्यावरणीय स्वच्छता कायम राखली जाईल याची खात्री करुन घ्या (या हंगामात आपल्यासोबत नेहमी हँड सॅनिटायझर ठेवा किंवा आपले हात वारंवार धुवा)
  • आपल्या परिसरातील मोकळे नाले आणि खड्डे बुजवलेले असल्याची खात्री करा
  • आपल्या मुलांचे लसीकरण करुन घ्या, ज़र त्यांनी लस घेतली नसल्यास 
  • जर काही कारणास्तव आपण बाहेरचे खाणे टाळू शकत नाही तर फक्त गरम खाद्यपदार्थ घेणे पसंत करा
  • बाहेरील कोशिंबीरी, सलाद आणि चटणी ह्यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळा
  • सोललेली फळे खा जेणेकरुन जीवाणू सालींबरोबर निघून जातील
  • शौचालय स्वच्छ ठेवा, शौचालय वापरण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा
  • पावसात योग्य पादत्राणे परिधान करा आणि पूरग्रस्त भागात चालल्यानंतर पाय धुवा आणि घरी आल्यावर नेहमी पाय धुवा.
  • डास प्रतिकारक वापरा आणि बाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला
  • आपल्या घरात डासांची जाळी (मच्छरदानी) वापरा
  • घरात आणि आसपास कुठेही पाणी साचू देऊ नका किंवा गोळा होऊ देऊ नका
  • घरातील स्वच्छता राखण्यासाठी आपले वॉशरूम नियमितपणे धुण्यास विसरू नका
  • खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकून ठेवा, व्हायरल झाल्यास हे सभोवतालच्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही
  • दर काही तासांनी कोमट पाणी प्या आणि उकळलेले पाणी स्वतः बरोबर ठेवा
  • आपली घरे नेहमीच हवेशीर आहेत याची खात्री करा
  • संतुलित आहार घ्या आणि आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवा.

सुरक्षित रहा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या.

 

-डॉ. हकीम परदावाला, एमडी, विभाग प्रमुख - मेडिसिन, सैफी हॉस्पिटल, मुंबई.

 

Web Title: Take care of yourself in the rainy season, learn expert tips, the rainy season will be healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.