लहान मुलांना सोबत घेऊन बाहेर जेवायला जाताय? ही घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 12:30 PM2018-09-10T12:30:39+5:302018-09-10T12:31:40+5:30
लहान मुलांना बाहेर जेवायला घेऊन जाणे हे एक फारच मोठं चॅलेन्जच आहे.
(Image Credit : money.usnews.com)
लहान मुलांना बाहेर जेवायला घेऊन जाणे हे एक फारच मोठं चॅलेन्जच आहे. हॉटेलमध्ये त्यांना सांभाळणं, जेवण भरवणं, मुलांमुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं आणि हे सगळं करत असताना स्वत:ही जेवण करणं सोपं काम नाहीये. याच कारणामुळे काही पालक हे बाहेज काही खाण्यासाठी जाणेच सोडतात आणि मुलं मोठी झाली की, ते पुन्हा बाहेर जेवायला जाण्यासाठी सुरुवात करतात. तुमच्यासोबत असे होऊ नये यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.
योग्य जागेची निवड
लहान मुलांना घेऊन बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या की, हॉटेल फॅमिली आणि किड्स फ्रेन्डली असावं. असे अनेक हॉटेल्स असतात जे जिथे लहान मुलांसाठी खास गोष्टी असतात. याने पालकांना मुलांना सांभाळणं सोपं होतं. अशा जागांवर जास्त तेच लोक येतात जे मानसिक रुपाने लहान मुलांच्या गोंधळासाठी तयार असतात. त्यामुळे ते तुमच्याकडे मुलांची काही तक्रारही करणार नाहीत.
थकलेल्या मुलांना बाहेर नेऊ नका
मुलं जर थकलेली असतील आणि अशात त्यांना तुम्ही बाहेर घेऊन गेलात तर ते आणखी चिडचिड करु लागतात. सोबतच वस्तू फेकणे, रडणे, ओरडणे यांसारख्या गोष्टी ते करु लागतात. त्यामुळे मुलं थकलेली असतील तर त्यांना बाहेर खाण्यासाठी घेऊन जाणे टाळा.
मुलांकडून ही अपेक्षा ठेवू नका
कोणतीच लहान मुले कधीच एका जागेवर बसत नसता, अशात फॅमिलीसोबत बाहेर हॉटेलमध्ये जायचं असेल तर त्यांना एका जागेवर बराचवेळ बसावं लागतं. अशावेळी जर मुलं पुन्हा पुन्हा जागेवरुन उठून जात असतील यात हैराण होण्यासारखं काहीच नाही. प्रयत्न हा करा की, जेवण सुरु होईपर्यंत त्याला जरा बाहेर फिरवून आणा. जेवण आल्यानंतर तो आपल्या मनाने एका जागेवर बसेल आणि तुम्हीही जेवण एन्जॉय करु शकाल.