मेडिक्लेम पॉलिसी काढा, अन्यथा येईल संकट; टाळाटाळ करत असाल तर व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 06:33 AM2021-12-06T06:33:21+5:302021-12-06T06:33:43+5:30

हल्लीच्या तणावपूर्ण जीवनशैलीत आरोग्याचा प्रश्न कधीही डोके वर काढू शकतो. कोणत्याची कारणाने रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली तर वैद्यकीय खर्च आ वासून पुढे उभा राहतो

Take out a mediclaim policy, otherwise crisis will come; Be careful if you are avoiding | मेडिक्लेम पॉलिसी काढा, अन्यथा येईल संकट; टाळाटाळ करत असाल तर व्हा सावध

मेडिक्लेम पॉलिसी काढा, अन्यथा येईल संकट; टाळाटाळ करत असाल तर व्हा सावध

googlenewsNext

डॉ. पुष्कर कुलकर्णी

‘फायनान्शिअल विस्डम’मधील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी. परिवाराच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक घटक. बरेचदा असे दिसून येते की, मेडिक्लेम पॉलिसी काढण्याबाबत कुटुंबातील कर्ती व्यक्ती टाळाटाळ करीत असते. पण, असे तुम्ही करत असाल तर सावध व्हा...

का काढत नाही मेडिक्लेम?

१. काय धाड भारलीये तब्येतीला? पाहू वेळच्या वेळी.
२. वार्षिक हप्ता भरायचा आणि काहीच झाले नाही, तर गेले ना पैसे वाया. ते थोडेच का परत मिळणार आहेत?
३. मेडिक्लेमपेक्षा अजूनही महत्त्वाचे खर्च आहेत की भलेथोरले.
४. उतरत्या वयात पाहू या पॉलिसीचे.
५. अनुकूल परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीचे भान नसणे.

का जरुरी आहे मेडिक्लेम?

हल्लीच्या तणावपूर्ण जीवनशैलीत आरोग्याचा प्रश्न कधीही डोके वर काढू शकतो. कोणत्याची कारणाने रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली तर वैद्यकीय खर्च आ वासून पुढे उभा राहतो. हा खर्च नेमका किती येईल, याचा अंदाजही बऱ्याचवेळा बांधणे कठीण होऊन जाते. या खर्चाची तजवीज करीत असते मेडिक्लेम पॉलिसी. म्हणूनच कुटुंबातील सर्वांचा आरोग्य विमा असणे अत्यंत आवश्यक आहे.

मेडिक्लेम पॉलिसी नसण्याचे तोटे काय?
अचानक हॉस्पिटलचा खर्च अंगावर आल्यास असलेल्या गंगाजळीतून खर्च केल्याने आपली बचत कमी होणे.
उपचारासाठी रक्कम उपलब्ध नसल्यास कर्ज काढण्याची वेळ येणे.
आर्थिक ताणतणावास सामोरे जाण्याची वेळ येणे.

मेडिक्लेमचे काय फायदे?

  • हॉस्पिटलच्या खर्चास तत्काळ कॅशलेस मंजुरी
  • कॅशलेस नसल्यास खर्चाचा परतावा
  • हॉस्पिटल खर्चाच्या अनाहूत भीतीच्या मानसिक तणावापासून कायमची मुक्तता.

Web Title: Take out a mediclaim policy, otherwise crisis will come; Be careful if you are avoiding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.