गरोदरपणात घ्या स्वत:ची व बाळाची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 03:17 PM2016-07-21T15:17:48+5:302016-07-21T20:47:48+5:30
आपण आई होतोय, ही गोष्ट एका स्त्रीसाठी स्वर्गतुल्य आनंद देणारी असते. असे म्हणतात की, जेव्हा एखादी स्त्री आई बनते तेव्हा त्या स्त्रीला पुर्णत्व येत असते
Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">रवींद्र मोरे
आपण आई होतोय, ही गोष्ट एका स्त्रीसाठी स्वर्गतुल्य आनंद देणारी असते. असे म्हणतात की, जेव्हा एखादी स्त्री आई बनते तेव्हा त्या स्त्रीला पुर्णत्व येत असते. नुकतेच आपणा सर्वांना कळले आहे की, बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आई होणार आहे. अभिनेत्री असल्याने शूटिंगची दगदग, धावपळ, कामाचा ताणतणाव, बाहेर फिरायचे म्हणजे प्रदुषणाचा धोका. यासर्व गोष्टींपासून करिनाला स्वत:ची व होणाºया बाळाची तर काळजी घ्यावीच लागणार आहे. हायप्रोफाइल व्यक्तितर ही काळजी सहज घेऊ शकतात, मात्र आपणासारखे सर्वसामान्यांचे काय? तर मग आपण आपली व होणाºया बाळाची काळजी कशी घ्यावी, याबाबत ‘सीएनएक्स’ने घेतलेला आढावा...
गरोदरपणात स्वत:ची व बाळाची काटेकारेपणे काळजी घेणे हे आईसाठी एक आवाहनच असते. गरोदरपणाचा जर पहिलाच अनुभव असेल तर स्वत:ला व बाळाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, त्यासाठी प्रथम बाळाला विविध केमिकलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. जे त्याच्यासाठी हानिकारक आहे. मग त्यासाठी कोणते केमिकल त्याला हानिकारक आहेत हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
केमिकल्सपासून बाळाला दूर ठेवा
एक्ने क्रीम - या क्रीममध्ये रेटिनोईड्स असल्याने ते जर रक्तात मिसळले तर बर्थ डिफेक्टचे कारण बनू शकते. म्हणून या काळात यापासून दूर राहा.
ट्राइक्लोसन साबण - अनेक साबण, टूथपेस्ट आणि हॅण्डवॉशमध्ये वापरण्यात येणारे अँटी बॅक्टीरियल ट्राइक्लोसन हे आपल्या शरीरातील हार्मोन्समध्ये अडथळा निर्माण करु शकते, म्हणून यापासून दूर रहा.
नेल पॉलिश - हेअर स्पे्र आणि नेल पॉलिश यात असलेल्या फ्थेलेट नामक पदार्थाच्या वासाने बाळाला हानी पोहचू शकते. म्हणून फ्थेलेट मुक्त पदार्थांचाच वापर करा.
लिपस्टिक- खूप वेळ टिकविण्यासाठी लिपस्टिक मध्ये लेड वापरले जाते. आणि हे अतिघातक आहे. यामुळे लवकर प्रसुती होण्याचा धोका संभवतो. यासाठी लेड मुक्त वस्तुंचा वापर करा.
ठेवा निरोगी आरोग्य आणि वाढवा सौंदर्य
याकाळात महिलांना आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्यही टिक वून ठेवावे लागते. त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे पौष्टिक व संतुलित आहार होय. मेथी, मटार, सफरचंद, कारले, पुदिना, काजू आदी पदार्थांतून भरपूर प्रमाणात लोह मिळते. रोजच्या आहारात खूप गोड नसावे. अपचन, त्वचारोग होण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून तेलकट आणि मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावेत. पौष्टिक आहाराबरोबरच अधिक प्रमाणात पाणीही प्यायला हवे. त्यामुळे पचन सुलभ होते आणि उत्सर्जनही. यामुळे त्वचा नितळ दिसून सौंदर्य खुलून येते. गरोदर महिलांनी आहारात दूध घेणे खूप महत्त्वाचे आहे. याचबरोबर प्रथिनासाठी डाळी, कडधान्ये घ्यावीत. आयोडीनचे योग्य प्रमाण दातांच्या विकारांना दूर ठेवते. व्हिटॅमिन्ससाठी ग्रीन सॅलेड, पालेभाज्या अवश्य खाव्यात.
गर्भपाताचा धोका टाळा
पहिल्या गर्भधारणेत सुमारे १५ टक्के स्त्रियांना गर्भपाताचा धोका संभवतो. संशोधनानूसार वजन कमी असणे किंवा जास्त असणे, कॉफीचे अतिसेवन करणे, आणि मुख्य कारण म्हणजे कमी झोप घेणे. परिपूर्ण झोप नाही घेतल्यास आरोग्यावर घातक परिणाम होतात. तसेच गर्भपात आणि कमी झोप यांचा खूपच जवळचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणून गर्भधारणा राहण्यासाठी पुरेशी शांत झोप घेणे आवश्यक आहे.
माता व बाळाची संसर्गापासून घ्या काळजी
गरोदरपणात सुरूवातीपासूनच रोग प्रतिकारशक्तीची काळजी घेणे गरजेचे असते. रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यास बाह्य विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. यावेळी संसर्ग झाल्यास डॉक्टरांच्या सल्लयाने इम्युन ग्लोब्युलिन इंजेक्शन घ्यावे. या इंजेक्शनमधील अॅन्टी बॉडीज संसर्ग होण्यापासून बचाव करतात. तसेच एखादा आजार झाल्यावर जर हे इंजेक्शन घेतले तर आजाराची तीव्रता कमी होते. गरोदरपणात काही समस्या आल्यास इंजेक्शनऐवजी डॉक्टर्स अॅन्टीव्हायरल टॅब्लेट्स घेण्याचा सल्ला देतात. यामुळे अनेक दुष्परिणाम टाळता येतात. यावेळी अशी समस्या येऊ नये, यासाठी रोगप्रतिबंधक लस टोचून घेणे सर्वात उत्तम ठरते.
रुबेला आजारापासून वाचवा बाळाला
रुबेला हा असाच मातेकडून भ्रुणाकडे संसर्गित होणारा अनुवंशिक विषाणूजन्य आजार आहे. आईला जर गर्भधारणेनंतर आठव्या ते दहाव्या आठवड्यात हा संसर्ग झाला तर, जन्माला येणाºया बाळाच्या जगण्याची शक्यता केवळ १०% असते. आणि जरी बाळ जगले तरी त्याच्यामध्ये अनेक दोष असू शकतात. आईला जर ११व्या आणि १६व्या आठवड्यात याचा संसर्ग झाल्यास आजाराची तीव्रता आणखी वाढते. १६व्या आठवड्यानंतर संसर्ग झाल्यास बाळाला यापासून होणारी इजा कमी प्रमाणात असते. संसगार्मुळे ८०% मुलांना ऐकण्यामध्ये समस्या येते, ५५% मुले मेंटली डिसएबल होतात आणि त्यांना डायबेटीसही होतो.