किडनीचे आरोग्य जपण्यासाठी करा 'हे' उपाय, दूर राहतील जीवघेणे आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 01:52 PM2021-06-11T13:52:24+5:302021-06-11T16:18:49+5:30
योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात आणि जीवन त्रासदायक होऊन बसते. किडनी आणि त्याची काळजी याविषयी आपण जाणून घेऊया...
शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. उत्तम जीवन जगण्यासाठी किडनीचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात आणि जीवन त्रासदायक होऊन बसते. किडनी आणि त्याची काळजी याविषयी डॉ. जस्टीन चॉई यांनी हेल्थलाईन संकेतस्थळाला दिलेली माहिती आपण जाणून घेऊया..
डायबिटीस रुग्णांसाठी...
डायलिसिस चालू असलेल्या रुग्णांमध्ये डायबिटीस हे किडनी निकामी होण्याचे कारण ठरू शकते. लघवीतून प्रोटीन जाणे हे याचे प्रथम लक्षण असु शकते. वेळेवर उपाययोजना केल्यास एसीईआय व एआरबी गटातील औषधी वापरून किडनी खराब होण्याची गती कमी करता येते.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ...
रक्तदाब वाढलेला राहिल्यास किडनीतील नसांवर दाब वाढून परिणाम होऊ लागतो. लघवीद्वारे प्रोटीन जाणे सुरू होते. रक्तातील युरिया वाढू लागेल आणि ते घातक ठरेल याला टालण्यासाठी महिन्यातून कमीत कमी दोनदा बीपी तपासणे आवश्यक असते. किडनीवरील प्रभाव ओळखण्यासाठी व त्याची उपाययोजना तत्काळ सुरू करण्यासाठी वर्षातून एकदा लघवीतील प्रोटीन व रक्तातील क्रिएटिनीन तपासणे गरजेचे आहे.
मुतखडा असलेल्या रुग्णांसाठी...
२४ तासांतील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण ३.५ ते चार लिटर असावे. जेणेकरून 24 तासांत दोन ते २.५ लिटर लघवी झाली पाहिजे. यामुळे नवीन खडा तयार होणे व असलेला खडा मोठा होत नाही. मुतखड्यामुळे लघवीला अडथळा होत असल्यास त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.