बेड-टी घेताय? सावधान !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2016 04:14 PM2016-11-03T16:14:09+5:302016-11-04T18:29:54+5:30
आपल्या देशात चहा पिण्याची सवयच आहे. गप्पा-गोष्टी करताना जर चहा घेतला नाही तर काहीतरी अपूर्ण वाटते. आपल्या देशाची सुमारे ८० ते ९० टक्के लोकसंख्या सकाळी उपाशीपोटी चहा पिणे पसंत करते. बेड-टीचे कल्चर फक्त शहरातच प्रचलित नव्हे तर गावागावातदेखील लोक सकाळची सुरुवात चहा पिऊनच करतात.
उपाशीपोटी चहा पिण्याचे धोके :
* ब्लॅक टी पिल्याने वजन कमी होते असा समज आहे, मात्र ब्लॅक टी पिल्याने पोट फुलते आणि भूक लागत नाही. याच कारणाने वजन कमी होते.
* उपाशीपोटी चहा पिल्याने पित्त रस बनण्याच्या क्रियेवर परिणाम होतो. या कारणाने उचकी लागते आणि ह्रदयावर दाब पडल्यासारखे वाटते.
* उपाशीपोटी दुधाचा चहा पिल्याने लवकर थकवा जाणवतो. सोबतच मूड-स्विंगचा प्रॉब्लेमदेखील वाढतो.
* वेळोवेळी गरम चहा पिल्याने धोका अधिक वाढतो, कारण आपण जेवढ्या वेळेस गरम चहा पिता तेवढ्या वेळेस साखरदेखील गरम होते आणि नेमका हाच धोका आहे.
* उपाशीपोटी चहा पिल्याने अल्सर होण्याची शक्यता असते.